Join us  

सचिन तेंडुलकर इनस्विंग चेंडूवर चाचपडायचा; पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजाचा दावा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मोडेल सचिनचे सर्व विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 3:48 PM

Open in App

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्याशी तुलना केली जात आहे. कोहलीची सातत्यपूर्ण कामगिरी यामागचं कारण आहे. कोहलीनं माजी फलंदाज तेंडुलकरची अनेक विक्रमही मोडली आहेत. कोहली हा सध्याचा सर्वोत्तम फलंदाज आहे आणि त्याच्या खेळीनं अनेकांना प्रभावीत केलं आहे. पाकिस्तानचे माजी दिग्गज सर्फराज नवाझ हेही त्यापैकी एक आहेत. 

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे माजी गोलंदाज यांनी कोहली आणि तेंडुलकर यांच्यातील तुलनेबाबत मोठं विधान केलं. यावेळी त्यांनी तेंडुलकर इनस्विंग चेंडू खेळताना चाचपडायचा, तर कोहलीच्या बाबतीत तसे होत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले,''विराट कोहलीची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. तो सचिन तेंडुलकरला सर्व आघाडींमध्ये मागे टाकतो. इनस्विंग चेंडूवर खेळताना तेंडुलकर चाचपडायचा, परंतु कोहली सहजतेनं फलंदाजी करतो. कारकिर्दीच्या सुरुवातीला तोही चाचपडायचा, परंतु आता तो फलंदाजीत तरबेज झाला आहे.''

कसोटी क्रिकेटमध्ये सुरुवातीला कोहली आऊटस्विंग चेंडूवर खेळताना अवघडायचा. पण, मागील काही वर्षांमध्ये 31 वर्षीय कोहलीनं आपल्या कमकुवत बाबींवर खूप मेहनत घेतली आहे. मॉडर्न एराचा तो सर्वोत्तम फलंदाज आहे. पण, तेंडुलकरच्या बाबतीत बोलायचे तर तो काही चेंडू खेळताना अवघडायचा. तरीही त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

हरभजन सिंग मागतोय सचिन तेंडुलकरकडे लिंबू, Video पाहून तुम्हालाही कळेल कारण

Shocking : WWE सुपरस्टारचा बुडून दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवण्यासाठी केला त्याग!

वाईट बातमी; अजिंक्य रहाणेच्या मामांचा विहिरीत पडून मृत्यू

Video : मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँच्या 'उमराव जान' लूकनं नेटिझन्सना केलं घायाळ 

इंडियन प्रीमिअर लीगच्या फॅन्ससाठी Good News!

टॅग्स :सचिन तेंडुलकरविराट कोहली