चिमुकल्याची भन्नाट फिरकी गोलंदाजी पाहून Sachin Tendulkarही भारावला, म्हणाला...

Sachin Tendulkar: सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रतिभासंपन्न चेहरे नेहमीच समोर येत असतात. सध्या एका चिमुकल्याचा फिरकी गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 10:18 AM2021-10-15T10:18:20+5:302021-10-15T10:23:50+5:30

Sachin Tendulkar was also overwhelmed by Chimukalya's abandoned spin bowling, he said ... | चिमुकल्याची भन्नाट फिरकी गोलंदाजी पाहून Sachin Tendulkarही भारावला, म्हणाला...

चिमुकल्याची भन्नाट फिरकी गोलंदाजी पाहून Sachin Tendulkarही भारावला, म्हणाला...

Next

मुंबई - सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रतिभासंपन्न चेहरे नेहमीच समोर येत असतात. सध्या एका चिमुकल्याचा फिरकी गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खुद्द क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडुलकरही भारावला आहे. त्याने फेसबूक आणि ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत या चिमुकल्याचं कौतुक केलं आहे. 
ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करताना सचिन तेंडुलकर म्हणाला की, वाव, हा व्हिडीओ मला मित्राकडून मिळाला. हा व्हिडीओ जबरदस्त आहे. त्यामध्ये या लहान मुलाचे क्रिकेटच्या प्रती असलेले प्रेम आणि आवड स्पष्ट दिसत आहे. 


दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र या व्हिडीओतील मुलाची गोलंदाजी जबरदस्त आहे. तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या जादुमय फिरकीच्या जोरावर नाचवताना दिसत आहे.  

Web Title: Sachin Tendulkar was also overwhelmed by Chimukalya's abandoned spin bowling, he said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app