Join us  

सचिन, सेहवाग, लारा एकाच लीगमध्ये खेळणार

ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि भारत या पाच देशांमध्ये खेळवली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 6:49 PM

Open in App

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, वेस्ट इंडिजचा माजी महान क्रिकेटपटू ब्रायन लारा आता एकाच लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. ही लीग लवकरच चाहत्यांपुढे येणार असल्याचे म्हटले जात आहे.

रोड वर्ल्ड सेफ्टी वर्ल्ड सीरीज ही ट्वेन्टी-20 स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि भारत या पाच देशांमध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा वर्षामधून एकदा खेळवण्यात येणार आहे.

बीसीसीआयने या ट्वेन्टी-20 लीगला परवानगी दिली आहे. या लीगमध्ये सचिनस सेहवाग, लारा यांच्याबरोबर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी ह्रोड्स आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान यांचाही समावेश होणार आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवाग