Join us  

हरभजन सिंग मागतोय सचिन तेंडुलकरकडे लिंबू, Video पाहून तुम्हालाही कळेल कारण

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहतो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 10:44 AM

Open in App

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहतो. रोज एखादा तरी व्हिडीओ किंवा ट्विट तो सोशल मीडियावर करत असतो. बुधवारी त्यानं ट्विटरवर असाच एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात त्यानं क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरकडे अजब मागणी केली. त्यानं तेंडुलकरकडे 2-3 लिंबू  मागितले. 

Shocking : WWE सुपरस्टारचा बुडून दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवण्यासाठी केला त्याग!

भज्जीनं बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्या व्हिडीओमध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकर बांबूच्या सहाय्यानं झाडावरील लिंबू पाडताना दिसत आहे. 29 सेकंदाच्या या व्हिडीओत एक व्यक्ती चुकून लिंबूला आंबा म्हणतो त्यावर सचिन, अरे हा आंबा नाही लिंबू आहे, असे उत्तर देत आहे. हा व्हिडीओ शेअर करून भज्जीनं क्रिकेटच्या देवाकडे 2-3 लिंबू माझ्यासाठीपण असं ट्विट केलं.  

पाहा व्हिडीओ...  मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकलापाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात आफ्रिदीनं काश्मीर आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर सोशल मीडियावर चौफेर टीका झाली. आफ्रिदीच्या या विधानानंतर नेटिझन्सनी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांना टार्गेट केले. आफ्रिदीच्या विधानाचा चांगला समाचार घेताना भज्जीनं त्याला मर्यादा ओलांडू नकोस, असा सज्जड दम भरला. 

India Today शी बोलताना भज्जी म्हणाला की,''पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीका खपवून घेतली जाणार नाही. तो समाजकार्य करत होता आणि माणूसकी म्हणून मी व युवीनं त्याला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. पण, आफ्रिदी आमच्या देशाला आणि पंतप्रधानांना नाव ठेवत असेल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही. यापुढे आफ्रिदीसोबत मैत्री ठेवणार नाही. त्यानं त्याची मर्यादा ओलांडू नये, अन्यथा त्याची लायकी दाखवून देऊ.'' 

टॅग्स :सचिन तेंडुलकरहरभजन सिंग