Join us  

सचिन तेंडुलकरनं केलं कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आवाहन; प्लाझ्मा थेरपी विभागाचं केलं उद्धाटन

सचिन तेंडुलकरनं अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल्समध्ये प्लाझ्मा थेरपी विभागाचं बुधवारी उद्धाटन केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 4:15 PM

Open in App

भारतातील कोरोना रुग्णाचा आकडा 7 लाखांच्या वर गेला असून सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यात अधिक सुधारणा व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना त्यांच्या रक्ताचा प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यात आता महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल्समध्ये प्लाझ्मा थेरपी विभागाचं बुधवारी उद्धाटन केलं. मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकारानं या विभागाची सुरुवात करण्यात आली आहे.

''कोरोना व्हायरसच्या संकटात आपण आरोग्याशी निगडीत अभूतपूर्व आव्हानाचा सामना करत आहोत. या परिस्थितीत डॉक्टर्स, नर्स, पोलीस, महानगर आणि सरकारचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या व्हायरसवर मात करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक संशोधन करत आहेत. प्लाझ्मा थेरपी हा एक पर्याय आपल्यासमोर आहे. हा विभाग सुरू केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे मी अभिनंदन करतो,''असे सचिन म्हणाला.

''कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी पुढे येऊन त्यांचे रक्त प्लाझ्मा थेरपीसाठी दान करावं आणि अन्य रुग्णांचं आयुष्य वाचवावं,''असंही सचिन म्हणाला.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

64 वर्ष जुन्या महालात राहतो 'बंगाल टायगर'; पाहूया सौरव गांगुलीच्या महालाचे Unseen फोटो! 

भारतीय क्रिकेटपटूंचा अ‍ॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!

'दादा'गिरी तो हम अंग्रेजों की धरती पर भी करेंगे...! 

Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत

टीम इंडियाचा फलंदाज 'डोसा' घेऊन पोहोचला विराट कोहलीच्या घरी, अन्... 

टॅग्स :सचिन तेंडुलकरकोरोना वायरस बातम्या