Join us  

सचिन सर्वोत्कृष्ट, सध्या कोहलीला पर्याय नाही

मायकेल क्लार्क : आॅस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे आगळेवेगळे विश्लेषण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 5:24 AM

Open in App

मेलबोर्न : विराट कोहलीमध्ये मोठी शतकी खेळी खेळण्याची सचिन तेंडुलकरसारखीच प्रबळ इच्छाशक्ती आहे. सचिन हा आमच्यावेळी सर्वांत परिपक्व फलंदाज होता. मात्र सध्या भारतीय विराट कोहलीला पर्याय नसल्याचे मत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने शुक्रवारी व्यक्त केले.‘मी खेळायचो त्यावेळी सचिनशिवाय अन्य कोणी परिपूर्ण फलंदाज होता असे मला आठवत नाही. सचिनच्या तंत्रात कुठलीही उणीव नसल्याने त्याला बाद करणे फारच कठीण असायचे,’ असे क्लार्कने ‘बिग स्पोर्टस् ब्रेकफास्ट’ या रेडिओ शो मध्ये बोलताना म्हटले आहे.तो पुढे म्हणाला,‘मी जितके काही फलंदाज पाहिले त्या सर्वांमध्ये सचिन तांत्रिकदृष्ट्या भक्कम होता. त्याच्या खेळात कुठलाही कमकुवतपणा पाहिला नाही. सचिनने एक तरी चूक करावी इतकीच आम्ही अपेक्षा व्यक्त करीत होतो.’क्लार्कने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा आक्रमकपणा आणि खेळातील कौशल्याचे तोंडभरून कौतुक केले. सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कोहली हाच सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे मत त्याने व्यक्त केले.‘माझ्या मते, विराट तिन्ही प्रकारात सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. त्याचा वन डे आणि टी २० तील विक्रम अद्वितीय असून कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व कसे गाजवायचे, याची कलादेखील विराटला अवगत झालेली दिसते. याशिवाय कोहली आणि सचिन यांच्या खेळात एक समान दूवा आहे. दोघांनाही मोठी शतकी खेळी ठोकणे पसंत आहे’, असे क्लार्क म्हणाला.२०० कसोटी सामने खेळणारा आणि १०० आंतरराष्टÑीय शतकांची नोंद करणारा सचिन हा जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. (वृत्तसंस्था)सचिनने स्वीकारली पाच हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारीमुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिन तेंडुलकर याने आपला वाटा उचलत ५० लाखांची आर्थिक मदत केली होती. त्यातच आता सचिनने एका संस्थेमार्फत सुमारे ५००० लोकांची जबाबदारीदेखील उचलली आहे. मुंबईतील गरीब आणि गरजूंची मदत करणाऱ्या ‘अपनालय’ नावाच्या संस्थेच्या मदतीने सचिनने हे स्तुत्य पाऊल उचलले आहे. सचिनने गरीब आणि गरजू अशा सुमारे ५००० लोकांच्या एका महिन्याच्या अन्नधान्याची आणि इतर आवश्यक रेशनची जबाबदारी अपनालय संस्थेमार्फत उचलली आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी अपनालयच्या साथीने सहकार्य केल्याबद्दल अपनालय संस्थेने सचिनचे आभार मानले आहेत. तर, सचिनने देखील आभार स्वीकार करून तुम्ही तुमचे सत्कार्य सुरू ठेवा आणि गरीब गरजूंना अशीच मदत करत राहा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.सचिनला बाद करणे सर्वांत कठीण होतेच्मायकेल क्लार्कने स्वत:च्या नेतृत्वात खेळलेल्या २०१५ च्या विश्वचषकातील स्मृतींना उजाळा दिला. त्यावेळी रिकी पाँटिंग, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, शेन वॉर्न आणि ग्लेन मॅक्ग्रा असे दिग्गज संघात होते. क्लार्कची ओळख संघात सर्वांत शैलीदार फलंदाज अशी होती.च्सचिन तेंडुुलकर, ब्रायन लारा, कुमार संगकारा, राहुल द्रविड आणि जॅक कालिस यांच्यासारख्या दिग्गजांविरुद्ध क्लार्क खेळला आहे. सचिनसारखा तांत्रिकदृष्ट्या भक्कम फलंदाज मी पाहिला नाही, असे त्याचे मत आहे.च्११५ कसोटी आणि २४५ एकदिवसीय सामने खेळलेल्या क्लार्कच्या मते सचिनला बाद करणे सर्वांत कठीण होते. क्लार्कच्या कसोटीत ८,६४३ आणि एकदिवसीय सामन्यात ७,९८१ धावा आहेत.

टॅग्स :सचिन तेंडुलकरविराट कोहली