Join us  

सचिन तेंडुलकरचा असाही 'कार'नामा!

'कारप्रेमी' असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिनला वेगवेगळ्या कंपन्यांच्या कारचा संग्रह करून ठेवण्याचा छंद आहे. म्हणूनच त्याला प्रत्येकवेळी विविध कारमधून फिरायला आवडतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 7:05 PM

Open in App
ठळक मुद्देसचिनची पहिली कार 'मारूती ८००' होती सचिनला वेगवेगळ्या कार चालवण्याचा छंद आहेसचिनने स्वत:च्या कार ठेवण्यासाठी स्वतंत्र्य गॅरेजही बनवलंय.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं क्रिकेट प्रेम जगविख्यात आहे. पण सचिन वेगवेगळ्या कारचाही चाहता आहे हे खूप कमी लोकांना माहितंय. सचिनकडे त्याच्या पहिल्या मारूती ८०० पासून ते सध्याच्या बीएमडब्लू आणि ऑडीपर्यंत सर्व कार आहेत. सचिनचं गॅरेज पाहिलं की त्याच्या कारप्रेमाचा प्रत्यय येतो.  

१) बीएमडब्लू 750 एम स्पोर्टसचिनची ही नवी कार त्याच्या आवडीनुसार खास डिझाईन करण्यात आली आहे. बीएमडब्लू ७५० ही एक स्पोर्ट्स कार असून तिचा वेग जास्त आहे. भारतामध्ये सचिनच्या या कारची किंमत २.२९ कोटी इतकी आहे. 

२)  बीएमडब्लू ७६० एल आय सचिनची ही कार त्याच्या सर्व कारच्या तुलनेत सर्वात जास्त सुखसोयीयुक्त आहे. ही कार बाहेरुन सर्वसामान्य कारप्रमाणे दिसणारी असली तरी आतून ही कार अत्यंत आकर्षक आहे. 

३) बीएमडब्लू एक्स ५ बीएमडब्लूचा ऍम्बेसेडेर म्हणून ओळखला जाणारा सचिन जगातील सर्वात महागडी आणि जलद एसयूव्ही चालवतो. सचिनची ही बीएमडब्लू एक्स ५ कार भारतात मिळत नाही. म्हणून सचिनसाठी ही बीएमडब्लू खास बनवण्यात आली आहे. 

४) बीएमडब्लू एम ६ ग्रॅन कूप बीएमडब्लू ग्रॅन कूप ही परदेशी कार असून सचिनसाठी खास भारतात आणली गेली होती. भारतातही आता ही कार मिळत असून तिची किंमत १.८ कोटी आहे. 

५) निसान जीटीआरसचिनच्या चाहत्यांची सर्वात आवडती कार म्हणजे निसान जीटीआर. सचिनने त्याची फेरारी कार बदली करून निसानची जीटीआर घेतली. सचिनच्या फॅन्सनी मुंबईतल्या रस्त्यांवर बऱ्याच वेळा मास्टर ब्लास्टरला ही लाल रंगाची कार चालवताना पाहिलंय.

६) मारूती ८००सचिनने विकत घेतलेली पहिली कार मारूती ८०० होती. ही कार अतिशय साधी मानली जात असली तरी त्या काळी ही कार घेणं खूप मोठी गोष्ट होती. भारताच्या कसोटी क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर १९८९ मध्ये सचिननं मारूती ८०० विकत घेतली होती.

टॅग्स :सचिन तेंडुलकर