Join us  

सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर पत्रकाराच्या भूमिकेत

भारताचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौ-यावर आहे. हा दौरा विशेष चर्चेत राहणार आहे तो भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुनच्या सहभागामुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 12:01 PM

Open in App

कोलंबो - भारताचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौ-यावर आहे. हा दौरा विशेष चर्चेत राहणार आहे तो भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुनच्या सहभागामुळे. श्रीलंकेच्या 19 वर्षांखालील संघाविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने एक डाव व 21 धावांनी विजय मिळवला. मात्र, चर्चा केवळ अर्जुनच्या पहिल्या विकेट्सची आणि नंतर फलंदाजीत भोपळ्यावर बाद झाल्याचीच झाली. आता अर्जुन पुन्हा चर्चेत आला आहे, पण यावेळी एक क्रिकेटपटू नाही तर पत्रकार म्हणून सोशल मीडियावर चमकत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसाआय) चित्रित केलेल्या व्हिडीओमध्ये अर्जुन पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. तो सहकारी अथर्व तायडेला एकामागून एक प्रश्न विचारत आहे. काय आहे हा व्हिडीओ पाहा...http://www.bcci.tv/videos/id/6400/in-conversation-with-u19-boys-arjun-tendulkar-atharwa-taideभारत आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा आयुष बदोनी ( 4 विकेट्स आणि नाबाद 185 धावा) चमकला. आयुषच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला. आयुषला हर्ष त्यागीने चार विकेट घेऊन तोलामोलाची साथ दिली. याशिवाय अर्जुन आणि मोहित जांगरा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.  गोलंदाजीत प्रभाव पाडल्यानंतर आयुषने फलंदाजीत तडाखेबाज खेळी केली. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 244 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने 589 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यात आयुषच्या नाबाद 185, तर अथर्व तायडेच्या 113 धावांच्या खेळीचा सिंहाचा वाटा आहे. भारताने 345 धावांची आघाडी घेतली आणि त्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव 324 धावांवर गडगडला. मोहित जांगराने 5 विकेट्स घेतल्या.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरक्रिकेटबीसीसीआयक्रीडा