Join us  

सबा करीमचे पद धोक्यात

महासंचालक (क्रिकेट संचालन) पदावर असलेले माजी यष्टिरक्षक सबा करीम यांचे पद धोक्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 2:04 AM

Open in App

नवी दिल्ली : जगातील अन्य क्रीडा संस्थांप्रमाणे बीसीसीआयसुद्धा कोविड-१९ महामारीमुळे आर्थिक संकटात आहे. त्यामुळे महासंचालक (क्रिकेट संचालन) पदावर असलेले माजी यष्टिरक्षक सबा करीम यांचे पद धोक्यात आले आहे. या प्रकरणासोबत जुळलेल्या सूत्राने आयएएनएसला सांगितले की, करीम यांचे पद धोक्यात आहे. कारण यात अनेक उलगडा न झालेल्या बाबी त्यांच्या कार्यकक्षेत येतात. आर्थिक स्थितीचा विचार करता खडतर निर्णय घेतले जाऊ शकतात. अधिकारी म्हणाले,‘ही परीक्षेची वेळ आहे. आम्हाला सर्वांना याची कल्पना आहे. सध्या तुम्हाला यापेक्षा वेगळा विचार करावा लागेल.या महामारीमुळे कमीत कमी नुकसान होईल, हे सुनिश्चित करावे लागेल. आम्ही ज्या मुद्यांवर चर्चा केली ते लक्ष देण्यासारखे होते. त्यानुसार त्यांचे योगदान चांगले नव्हते.’अधिकारी पुढे म्हणाले,‘केवळ हा एकमेव मुद्दा नाही. ज्यावेळी स्थानिक क्रिकेटच्या कॅलेंडरची चर्चा होते त्यावेळी सध्याच्या स्थितीत आमच्याकडे त्याबद्दल काही ठोस विचार नाही. अनेक राज्य संघटनांनी करीम यांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला आहे.’ अधिकाऱ्यांनी सांगितले की,‘राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची चर्चा केली तर आता राहुल द्रविड व केव्हीपी यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी ही जबाबदारी सबा करीम यांच्याकडे होती. अम्पायर अकादमीची जबाबदारी सबाकडे होती. ही अकादमी संपण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे तुम्ही संघटनेकडून काय घेतले यापेक्षा संघटनेसाठी तुम्ही काय करता, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.’अधिकारी पुढे म्हणाले,‘जगभराचा विचार केला तर परिस्थिती कठीण होत आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलिया व ईसीबीने कठोर निर्णय घेतले आहेत.’ (वृत्तसंस्था)

>करीम यांच्याविरुद्ध अनेक तक्रारीएका अधिकाऱ्यानुसार सबा करीम महिला संघ निवडीत ढवळाढवळ करतात. महिला संघ, सपोर्ट स्टाफ, निवड समितीच्या मावळत्या सदस्यांनी करीम यांचे वर्तन आणि लुडबुडीची वारंवार तक्रार केली. ते माजी निवडकर्ते असले तरी सध्या ज्या पदावर आहेत, त्यामुळे त्यांचा हस्तक्षेप अनेकांना खटकतो. सीओए सदस्यांनी त्यांची महिला संघ निवडीबाबत तक्रार केली होती. याशिवाय महासंचालक पदासाठी स्रातक पदवी अनिवार्य असताना करीम यांच्याकडे ती पदवी नाही, अशीही तक्रार आहे. एनसीए स्टाफच्या पदभरतीत मर्जीतील लोकांसाठी नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा गंभीर आरोपही करीम यांच्यावर आहे. सीईओ राहुल जोहरी ज्या पद्धतीने बीसीसीआयच्या हिताचे काम करतात, त्या तुलनेत सबा करीम यांचे काम नसल्याचे या अधिकाºयाचे मत आहे.