Join us  

दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गरची रन आऊट करण्यासाठीची डान्स स्टेप्स पाहिलीत का?

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या आणि पाहुण्या श्रीलंकेचा पहिला डाव 191 धावांत गुंडाळला. दुसऱ्या डावात त्यांनी 4 बाद 126 धावा करताना 170 धावांची आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 4:43 PM

Open in App

डर्बन, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका : दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या आणि पाहुण्या श्रीलंकेचा पहिला डाव 191 धावांत गुंडाळला. दुसऱ्या डावात त्यांनी 4 बाद 126 धावा करताना 170 धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात डेल स्टेनने चार विकेट घेत भारताचे महान गोलंदाज कपिल देव यांचा विक्रम मोडण्याचा पराक्रम केला. पण, या सामन्यात अशी घटना घडली की ती आठवताच हसू आवरत नाही. दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गरने ज्यापद्धतीने रन आऊट करण्याचा प्रयत्न केला, तो चर्चेचा विषय ठरला. 

दिनेश करुणारत्ने आणि ओशादा फर्नांडो हे फलंदाजी करत असताना एल्गरने एकमेव षटक टाकले. 14व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर करुणारत्नेने स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारला. तेथे उभ्या असलेल्या डेल स्टेनने तो चेंडू त्वरित नॉन स्ट्रायकर एन्डला उभ्या असलेल्या गोलंदाज एल्गरच्या दिशेने फेकला. पण एल्गरला तो चेंडू पकडता आला नाही आणि एल्गरला गिरकी घ्यावी लागली व त्याच्या पायानं स्टम्प पडला. त्याची ही गिरकी एकाद्या डान्स स्टेप्स प्रमाणे होती. 

पाहा व्हिडीओ... 

DeanElgarDance_edit_1 from showmewhatugot on Vimeo.

दरम्यान, डेल स्टेनने विक्रमाला गवसणी घातली. त्याने श्रीलंका विरुद्धच्या कसोटी सामन्यात 4 विकेट घेत भारताचे महान कर्णधार व जलदगती गोलंदाज कपिल देव यांचा विक्रम मोडला.  हा कसोटी सामना सुरू होण्यापुर्वी स्टेनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 433 विकेट्स होत्या आणि त्याला कपिल देव यांच्या ( 434 विकेट्स) विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी एका विकेटची गरज होती. स्टेनने पहिल्या डावात 20 षटकांत 48 धावा देत 4 विकेट घेतल्या आणि कपिल देव यांचा विक्रम मोडला. यासह त्याच्या खात्यात 437 विकेट्स झाल्या आहेत आणि त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडशी ( 437 विकेट्स) बरोबरी केली आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्टेनने ब्रॉडसह संयुक्तपणे सातवे स्थान पटकावले आहे. कपिल देव यांनी 434 विकेट्ससाठी 131 कसोटी खेळल्या, तर स्टेनने 92 कसोटीत 437 विकेट्स घेतल्या. 
टॅग्स :द. आफ्रिकाश्रीलंका