Join us  

IPL 2022 : लोकेश राहुल सर्व रेकॉर्ड मोडणार, महागडा खेळाडू ठरणार; लखनौ फ्रँचायझीनं दिली छप्परफाड ऑफर

इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२२ पर्वासाठी खेळाडूंना रिटेन राखण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख दिली आहे. आयपीएल  २०२२ त दोन ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 2:50 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२२ पर्वासाठी खेळाडूंना रिटेन राखण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख दिली आहे. आयपीएल  २०२२ त दोन नव्या संघाच्या समावेशामुळे मेगा ऑक्शन होणार आहे, परंतु यंदा फ्रँचायझींसाठी राईट टू मॅच ( RTM) नसल्यामुळे फ्रँचायझींना रिलिज केलेल्या खेळाडूला पुन्हा रिटेन करता येणार नाही. आतापर्यंत आयपीएल फ्रँचायझींनी त्यांची अंतिम यादी जाहीर केलेली नाही, परंतु अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझींनी त्यांची संघबांधणी सुरू केली आहे. लोकेश राहुलनं ( KL Rahul) पंजाब किंग्सकडून ( Punjab Kings) न खेळण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यामुळे नवीन फ्रँचायझी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक आहेत.  

वृत्तानुसार पंजाबनं  जर लोकेशला रिलिज केलं, तर लिलिवात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. बीसीसीआयच्या नियमानुसार नव्यानं दाखल झालेल्या दोन फ्रँचायझींना अन्य ८ फ्रँचायझींनी रिलिज केलेल्या खेळाडूंपैकी प्रत्येकी ३ खेळाडूंना मेगा ऑक्शनपूर्वी करारबद्ध करता येणार आहे. त्यामुळे लोकेश लखनौ फ्रँचायझीकडून खेळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. लखनौ फ्रँचायझीनं  लोकेशला २ ० कोटींहून अधिक रक्कम देण्याची ऑफर दिली असल्याचे वृत्त काही इंग्रजी वेबसाईट्सनी दिले आहे. भारतीय ट्वेंटी-२० संघाच्या उपकर्णधाराला पंजाब किंग्सनं ११ कोटींत ताफ्यात घेतले होते. त्यामुळे त्याला ९ कोटींची भरघोस वाढ मिळण्याचे वृत्त आहे.

बीसीसीआयच्या रिटेन नियमानुसार जर पंजाब किंग्सनं त्याला कायम राखण्याचा निर्णय घेतला, तर त्याला जास्तीत जास्त १६ कोटी मिळू शकतात. आयपीएल २०१८ पासून लोकेशनं आयपीएलच्या चार पर्वात अनुक्रमे ६५९,  ५९३, ६७० व ६२६ धावा केल्या आहेत. संजिव गोएंगा यांच्या RPSG Gproup नं ७०९० कोटी रुपयांची बोली लावून लखनौ फ्रँचायझी खरेदी केली. लखनौ फ्रँचायझीनं आदिल राशिदलाही १६ कोटींची ऑफर दिल्याचेही वृत्त आहे.    

टॅग्स :आयपीएल २०२१लोकेश राहुल
Open in App