Join us  

RR vs RCB Latest News : रॉबीन उथप्पा अन् स्टीव्ह स्मिथची फटकेबाजी, राजस्थानचं RCBला तगडं आव्हान

RR vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील प्ले ऑफचे आव्हान जीवंत राखण्यासाठी राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) आता पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागेल.

By स्वदेश घाणेकर | Published: October 17, 2020 5:19 PM

Open in App

RR vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील प्ले ऑफचे आव्हान जीवंत राखण्यासाठी राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) आता पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागेल. आज RRने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) विरु्द्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. IPL 2020त सातत्यानं अपयशी ठरलेल्या रॉबीन उथप्पाला RRने बेन स्टोक्ससह सलामीला पाठवण्याचा डाव खेळून जोस बटलरवर मॅच फिनिशरची जबाबदारी टाकली. त्याला मोठी खेळी करता आली नसली तरी कर्णधार स्टीव्ह स्मिथची बॅट आज तळपली. उथप्पाही फॉर्मात परतला. यांच्या फटकेबाजीनं RRला मोठा पल्ला गाठून दिला.

उथप्पानं वॉशिंग्टन सूंदरनं टाकलेल्या चौथ्या षटकात चार चौकार खेचून एका विक्रमाला गवसणी घातली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ४५००+ धावा करणारा उथप्पा हा एकून ९वा आणि सहावा भारतीय खेळाडू ठरला. IPL 2020त प्रथम सलामीला आलेल्या उथप्पा पूर्वीच्या अंदाजात दिसला. त्यानं पदलालित्य दाखवत सुरेख फटके मारले. बेन स्टोक्स संयमी खेळ करत त्याला साथ देत होता. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या, परंतु ख्रिस मॉरिसनं टाकलेल्या सहाव्या षटकात स्टोक्स ( १५) बाद झाला.

विराट कोहलीनं ८वे षटक युझवेंद्र चहलच्या हाती सोपवलं. संजू सॅमसननं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून त्याचं स्वागत केलं. पण, याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर चहलनं RRला मोठा धक्का दिला. त्यानं २२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ४१ धावा करणाऱ्या उथप्पाला माघारी पाठवले. पुढच्याच चेंडूवर सॅमसनही ( ९) बाद झाला. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी ५८ धावांची भागीदारी करताना RRचा डाव सावरला. ख्रिस मॉरिसनं ही भागीदारी तोडली. जोस बटलर २४ धावांवर माघारी परतला. पण, स्मिथनं एका बाजूनं फटकेबाजी करताना ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 

स्मिथ आणि राहुल टेवाटिया यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना राजस्थान रॉयल्सला ६ बाद १७७ धावांचा पल्ला गाठून दिला. स्मिथ ३६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर माघारी परतला. पदार्पणवीर शाहबाज अहमदनं सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. टेवाटिया १९ धावांवर नाबाद राहिला. 

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्सस्टीव्हन स्मिथरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर