RR Vs PBKS IPL LIVE : पंजाब किंग्स Vs राजस्थान रॉयल्स; टॉस जिंकून RR ने घेतला गोलंदाजीचा निर्णय

RR Vs PBKS IPL LIVE: प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 07:19 PM2023-05-19T19:19:35+5:302023-05-19T19:22:54+5:30

whatsapp join usJoin us
RR Vs PBKS IPL LIVE : Punjab Kings Vs Rajasthan Royals; RR won the toss and decided to bowl | RR Vs PBKS IPL LIVE : पंजाब किंग्स Vs राजस्थान रॉयल्स; टॉस जिंकून RR ने घेतला गोलंदाजीचा निर्णय

RR Vs PBKS IPL LIVE : पंजाब किंग्स Vs राजस्थान रॉयल्स; टॉस जिंकून RR ने घेतला गोलंदाजीचा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR Vs PBKS IPL LIVE: आज IPL 2023 मध्ये पंजाब किंग्ज (Punjan Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात 66वा सामना धर्मशाला मैदानावर होत आहे. धर्मशालाच्या मैदानावर हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे रविचंद्रन अश्विन आजच्या सामन्यात खेळणार नाही. राजस्थानमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत, तर पंजाबच्या संघात कोणताही बदल झालेला नाही.

पंजाबने 13 पैकी 6 सामने जिंकले
पंजाबने या मोसमात आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये सहा सामन्यात विजय मिळाला आहे तर सात सामने गमावले आहेत. संघाचे सध्या 12 गुण आहेत. पंजाबमध्ये परदेशी लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, कागिसो रबाडा, नेथन एलिससह शिखर धवन, जितेश शर्मा आणि अर्शदीप सिंग चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

राजस्थानने 13 पैकी 6 सामने जिंकले
राजस्थाननेही या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 7 गमावले आहेत. संघाचे 12 गुण आहेत. राजस्थानमध्ये परदेशी खेळाडू जॉस बटलर, जो रूट, शिमरॉन हेटमायर, अॅडम झाम्पा आणि यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन संघासाठी चमकदार कामगिरी करत आहेत.

रनरेट ठरणार महत्वाचा
दोन्ही संघांनी 13 सामने खेळले असून, 12 गुण मिळवले आहेत. आजचा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरोचा असणार आहे. पण, रनरेटच्या बाबतीत राजस्थान पंजाबपेक्षा वर आहे. पण, या दोन्ही संघांचे प्लेऑफचे गणित इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. तरीदेखील पंजाब आणि राजस्थान या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11 

पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करण, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, राहुल चहर, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग. प्रभावशाली खेळाडू: नॅथन एलिस, सिकंदर रझा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषी धवन आणि मोहित राठी.

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी आणि युझवेंद्र चहल.

Web Title: RR Vs PBKS IPL LIVE : Punjab Kings Vs Rajasthan Royals; RR won the toss and decided to bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.