Join us  

RR vs KKR Latest News : बाबो... आंद्रे रसेलचे खणखणीत षटकार पाहून KKR फॅन्स सुखावले; Video

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात दुबईत सामना होत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: September 30, 2020 9:01 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात दुबईत सामना होत आहे. उभय संघ पहिल्यांदाच दुबईच्या स्टेडियमवर खेळत असल्यानं येथील खेळपट्टीचा दोघांनाही अंदाज नाही. पण, आजच्या सामन्यात आघाडीवर फलंदाजीला आलेल्या आंद्रे रसेलच्या खणखणीत षटकारांनी KKR चाहत्यांना आनंद दिला. 

सुनील नरीनला मिळालं जीवदान, पण...राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार स्टीव्हन स्मिथ ( Steven Smith) यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरनं पहिल्या षटकात जवळपास 150kphच्या वेगानं मारा करताना केवळ एकच धाव दिली. त्यानंतर पुढच्या षटकात शुबमन गिलनं ( Shubman Gill) ने धावा चोपल्या. जयदेव उनाडकटनं तिसरे षटक टाकले आणि त्यात त्यानं KKRचा सलामीवीर सुनील नरीन याला बाद केलेच होते. पण, रॉबीन उथप्पानं त्याचा झेल सोडला. उनाडकटनं टाकलेल्या पाचव्या षटकात नरीननं खणखणीत षटकार अन् सुरेख चौकार मारला. पण, उनाडकटनं त्यानंतर संथ चेंडूवर नरीनचा त्रिफळा उडवला. KKRला 36 धावांवर पहिला धक्का बसला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये KKR ला 1 बाद 42 धावा करता आल्या.

शुबमन आणि नितिश राणा यांनी पुढच्या चार षटकांत 10च्या सरासरीनं धावा चोपल्या. नितिशने 17 चेंडूंत 22 धावा केल्या. किंग्स इलेव्हन पंजाबला ( KXIP) इंगा दाखवणाऱ्या राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) गोलंदाजीत कमाल दाखवताना ही जोडी तोडली. त्यानं टाकलेल्या 10व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर नितिशला माघारी पाठवले. त्यानंतर फलंदाजीला दिनेश कार्तिक किंवा इयॉन मॉर्गन अपेक्षित होते. परंतु, आंद्रे रसेल आल्यानं सर्वांना धक्का बसला. दुसऱ्या बाजूनं गिल फटकेबाजी करत होता. रसेलला रोखण्यासाठी स्टीव्ह स्मिथनं गोलंदाजीत बदल करत जोफ्रा आर्चरला पुन्हा पाचारण केले. आर्चरनं 12व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गिलला ( 47) माघारी पाठवले. आंद्रे रसेलला ( Andre Russell) फलंदाजीच्या क्रमवारीत बढती देणं KKRसाठी फलदायी ठरलं. श्रेयस गोपाळच्या एका षटकात त्यानं दोन खणखणीत षटकार खेचले. दुसऱ्या बाजूनं कर्णधार दिनेश कार्तिक फार काळ खेळपट्टीवर टीकला नाही. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) त्याला यष्टिरक्षक जोस बटलरकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. रसेलच्या फटकेबाजीनं आज KKR चाहते मंत्रमुग्ध होतील, अशी अपेक्षा होती. त्यानं तीन खणखणीत षटकार खेचून तशी सुरुवात तर केली होती. KKRचा सहमालक आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खान यानेही स्टेडियमवर उपस्थिती लावली होती. पण, अंकित राजपूतनं ( Ankit Rajpoot) रसेलचा झंझावात रोखला.

14व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तुफान षटकार खाल्यानंतरही राजपूतनं कमबॅक केलं आणि दुसऱ्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटवर उनाडकटकरवी रसेलला माघारी पाठवले. त्यानं 14 चेंडूंत 24 धावा केल्या.  

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स