Join us  

RR vs DC Latest News : अ‍ॅनरिच नॉर्ट्झेनं टाकला IPLमधील सर्वात वेगवान चेंडू; DC-RRयांची सोशल मीडियावर जुंपली, Video

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात आज इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील ३०वा सामना होत आहे

By स्वदेश घाणेकर | Published: October 14, 2020 10:16 PM

Open in App

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात आज इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील ३०वा सामना होत आहे. राजस्थान रॉयल्सनं ( RR) सुरुवात तर दणक्यात केली, परंतु त्यांना DCच्या तगड्या फलंदाजांनी चोपून काढले. २ बाद १० अशा अवस्थेत असलेल्या दिल्लीसाठी शिखऱ धवन आणि श्रेयस अय्यर यांनी धाव घेतली आणि राजस्थान समोर तगडे आव्हान उभे करून दिले. DC चा गोलंदाज अॅनरीच नॉर्ट्झे यानं IPLच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकून विक्रम केला. 

दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, जोफ्रा आर्चरनं दिल्लीला अवघ्या १० धावांवर दोन धक्के दिले. पृथ्वी शॉ ( ०) पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला, तर रहाणे ( २) तिसऱ्या षटकात रॉबीन उथप्पाच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करून DCचा डाव सावरला. धवननं ३३ चेडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा चोपल्या.  अय्यरने ४३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकांसह ५३ धावा केल्या. दोन सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि अॅलेक्स कैरी यांनी दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला. स्टॉयनिस १८ धावांवर माघारी परतला. RRकडून आर्चरनं ४ षटकांत १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं ७ बाद १६१ धावा केल्या.

बेन स्टोक्स आणि जोस बटरल यांनी RRला दणदणीत सुरुवात करून दिली. त्यांना नशीबानंही सुरुवातीला साथ दिली. बेन स्टोक्सला रन आऊट करण्याची संधी अजिंक्य रहाणेनं गमावली. तिसऱ्या षटकात अॅनरीच नॉर्ट्झेच्या गोलंदाजीवर एक षटकार व दोन खणखणीत षटकार मारून बटलरनं DCचे धाबे दणाणून सोडले. पण, नॉर्ट्झेनं त्याच षटकात त्याचा त्रिफळा उडवला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ ( १) आर अश्विनच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड झाला. RRनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ बाद ५० धावा केल्या. नॉर्ट्झेनं बटरलची विकेट घेण्यापूर्वी टाकलेला चेंडू विक्रमी ठरला. त्यानं १५६.२२kmphच्या वेगानं तो चेंडू टाकला आणि IPLमधील तो सर्वात वेगवान चेंडू ठरला. 

यावरून दिल्लीनं राजस्थानची सोशल मीडियावर फिरकी घेतली.

पाहा व्हिडीओ

 

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्स