Join us  

RR vs DC Latest News : रिषभ पंतचा 'पोपट' झाला; धाव घेतोय की चालतोय हेच विसरला, Video

RR vs DC Latest News :शारजाहच्या खेळपट्टीचा अधिक अभ्यास असलेल्या राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) प्रथम फलंदाजीसाठी बोलावले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 09, 2020 8:32 PM

Open in App

शारजाहच्या खेळपट्टीचा अधिक अभ्यास असलेल्या राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) दुसऱ्याच षटकात कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) चा निर्णय योग्य ठरवला. आर्चरच्या चेंडूवर लेग साईटला टोलावलेला फटका यशस्वी जैस्वालनं शॉर्ट मिडविकेटवर अचूक टिपला. चांगल्या फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ ( 19) यालाही आर्चरनं बाद केले. पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारणाऱ्या पृथ्वीला दुसऱ्याच षटकात आर्चरने कट अँड बोल्ड केले. DCचा कर्णधार श्रेयस अय्यरला ( 22) सहाव्या षटकात जैस्वालनं भन्नाट थ्रो करून धावबाद केले.  

रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) ही जोडी दिल्लीचा डाव सावरताना दिसत होती. पण, स्टीव्ह स्मिथच्या आक्रमक नेतृत्वानं त्यांना मोठे फटके मारण्यापासून रोखून ठेवले होते. त्यात दोघांमधील समन्वय चुकल्यानं रिषभ ( 5) धावांवर धावबाद झाला. दिल्लीला 10 षटकांत 4 बाद 84 धावा करता आल्या. स्टॉयनिसनं रिषभला कॉल दिला, परंतु तो खेळपट्टीच्या मधोमध आल्यावर स्टॉयनिसनं माघारी पाठवले. ही धाव घेताना रिषभ धावतोय की चालतोच हेच अनेकांना कळले नाही आणि राहुल टेवाटियानं त्याला धावबाद केले.

पाहा व्हिडीओ...

  • Rajasthan Royals Team - यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, स्टीव्हन स्मिथ, संजू सॅमसन, महिपाल लोम्रोर, राहुल टेवाटिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी, अँड्य्रू टाय, वरूण आरोन
  • RR - वरुण आरोन, अँड्य्रू टाय ( IN); अंकित राजपूत, टॉम कूरन ( OUT)
  • Delhi Capitals Team - पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, अॅनरीच नॉर्ट्जे, हर्षल पटेल. 
  • 2018 मध्ये पर्पल कॅपचा मान पटकावणारा अँड्य्रू टाय आज राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करत आहे... गुजरात लायन्सकडून IPLमध्ये पदार्पण करताना त्यानं रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध हॅटट्रिकसह 5/17 अशी कामगिरी केली होती.  
टॅग्स :IPL 2020रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्स