RCBची IPL 2024 जिंकण्याची तयारी, पण स्टार फलंदाजाच्या डोक्यात निवृत्तीचा विचार

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला २२ मार्चपासून गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 10:04 AM2024-03-07T10:04:08+5:302024-03-07T10:05:02+5:30

whatsapp join usJoin us
Royal Challengers Bangalore wicketkeeper-batter Dinesh Karthik set to end IPL career after 2024 season | RCBची IPL 2024 जिंकण्याची तयारी, पण स्टार फलंदाजाच्या डोक्यात निवृत्तीचा विचार

RCBची IPL 2024 जिंकण्याची तयारी, पण स्टार फलंदाजाच्या डोक्यात निवृत्तीचा विचार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 ( Marathi News ) :  इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला २२ मार्चपासून गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने सुरुवात होणार आहे. फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणारा Royal Challengers Bangalore चा संघ त्यांचा आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज होत आहे. त्यांनी ट्रेड विंडोमध्ये मुंबई इंडियन्सकडून स्फोटक फलंदाज कॅमेरून ग्रीन याला आपल्या ताफ्यात घेतले आहे. पण, त्याचवेळी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) याने निवृत्तीचा विचार सुरू केला आहे. यंदाची आयपीएल ही त्याची शेवटची असेल असे वृत्त समोर येत आहे आणि ३९ वर्षीय कार्तिक कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबतची निर्णय जाहीर करेल.


दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून आयपीएल कारकीर्दीची सुरुवात करणारा कार्तिक हा २००८ मध्ये बीसीसीआयने ही टूर्नामेंट लाँच केल्यापासून प्रत्येक मोसमात सहभागी होणाऱ्या सात खेळाडूंपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, ऋद्धिमान साहा आणि मनीष पांडे हे २००८ पासून आयपीएल खेळत आहेत. निवृत्तीनंतर कार्तिक तामिळनाडू संघासाठी काम करेल आणि समालोचनाचे काम करेल.


कार्तिकला २०२३ च्या पर्वात ११ सामन्यांत फक्त १४० धावा करता आल्या होत्या. २०२२ मध्ये बंगळुरूने कार्तिकला लिलावात ५.५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्या पर्वात त्याने फिनिशरची भूमिका बजावली आणि १६ सामन्यांमध्ये ५५ च्या सरासरीने आणि १८३.३३ च्या स्ट्राइक-रेटने ३३० धावा केल्या होत्या.  आयपीएलच्या धडाकेबाज फॉर्ममुळे कार्तिकला २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले होते, परंतु तो तीन डावांत केवळ १४ धावा करू शकला.


कार्तिक यापूर्वी २०१५ मध्ये बंगळुरूकडून खेळला होता. कार्तिकने डेअरडेव्हिल्स ( २००८ व २०१४), किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स - २०११), मुंबई इंडियन्स ( २०१२-१३), गुजरात लायन्स ( २०१६-१७ ), नाइट रायडर्स ( २०१८ व २०२१ ) आणि रॉयल चॅलेंजर्स ( २०१५ व २०२२ ) अशा सहा आयपीएल संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने एकूण २४० सामन्यांमध्ये २६ च्या सरासरीने ४५१६ धावा केल्या आहेत.  

Web Title: Royal Challengers Bangalore wicketkeeper-batter Dinesh Karthik set to end IPL career after 2024 season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.