Join us  

Ross Taylor, NZ vs NED Video: रॉस टेलरला राष्ट्रगीताच्या वेळी मुला-बाळांसमोर अश्रू अनावर, मैदानातच झाला भावूक; निरोपाच्या सामन्यात केल्या १४ धावा

रॉस टेलरने १६ वर्षे न्यूझीलंडतर्फे गाजवलं मैदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 6:55 PM

Open in App

Ross Taylor, NZ vs NED Video: न्यूझीलंडचा सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक मानला जाणारा फलंदाज रॉस टेलर याने आज शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्याच्या शेवटच्या सामन्यात तो खूपच भावनिक झाल्याचं दिसून आलं. रॉस टेलरचा हा न्यूझीलंडसाठी ४५० वा आणि निरोपाचा सामना होता. हा वन डे सामना खेळून त्याने १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट केला. ३८ वर्षीय फलंदाजाने या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला, पण सेडन पार्क या त्याच्या घरच्या मैदानावर त्याने शेवटचा वन डे सामना खेळून सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केलं. या सामन्यादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना रॉस टेलरला रडू अनावर झालं. आपल्या तीन मुलांसमोरच तो ढसाढसा रडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. झाला व्हिडीओ-

राष्ट्रगीत सुरू असताना रॉस टेलरची तीन मुले मॅकेन्झी, जॉन्टी आणि अडलेड त्याच्यासोबत होते. जेव्हा तो मैदानात उतरला आणि परतला तेव्हा नेदरलँडच्या खेळाडूंनी त्याला 'गार्ड ऑफ ऑनर' दिलं. राष्ट्रगीताच्या वेळी रॉस टेलरच्या डोळ्यात अश्रू होते.

रॉस टेलरने २००६ मध्ये न्यूझीलंडकडून पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पुढच्या वर्षी तो पहिला कसोटी खेळला. त्याने ११२ कसोटी सामन्यांमध्ये १९ शतकांच्या मदतीने ७ हजार ६८३ धावा केल्या. टेलरने २३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८ हजार ५९३ धावा आणि १०२ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १ हजार ९०९ धावा केल्या. तीनही फॉरमॅटमध्ये १००हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा टेलर हा जगातील एकमेव खेळाडू आहे.

टॅग्स :रॉस टेलरन्यूझीलंड
Open in App