मँचेस्टर : फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्ध सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक वर्षांपासून असलेले दोन प्रमुख विक्रम मोडण्याची संधी आहे.रोहितने आतापर्यंत ८ सामन्यांत ९२.४२ च्या सरासरीने ६४७ धावा केल्या आहेत. त्याला एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा सचिनचा विक्रम मोडण्यासाठी केवळ २७ धावांची गरज आहे. सचिनने दक्षिण आफ्रिकेत २००३ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ११ सामन्यांत ६१.१८ च्या सरासरीने ६७३ धावा केल्या होत्या. तेव्हापासून एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम सचिनच्या नावावर कायम आहे. सचिनने त्यावेळी आपल्या पूर्वीच्या विक्रमात सुधारणा केली होती. त्याने १९९६ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत सात सामन्यात ५२३ धावा केल्या होत्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रोहितची नजर सचिनच्या दोन मुख्य विक्रमांवर
रोहितची नजर सचिनच्या दोन मुख्य विक्रमांवर
मँचेस्टर : फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्ध सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक वर्षांपासून असलेले दोन प्रमुख विक्रम मोडण्याची संधी आहे....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 05:26 IST