रोहितने नाणेफेक जिंकली, भारताची प्रथम गोलंदाजी 

भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 06:47 PM2018-03-18T18:47:23+5:302018-03-18T18:47:37+5:30

whatsapp join usJoin us
Rohit won the toss, India's first bowling | रोहितने नाणेफेक जिंकली, भारताची प्रथम गोलंदाजी 

रोहितने नाणेफेक जिंकली, भारताची प्रथम गोलंदाजी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो - निदाहास चषक टी-20 च्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आंमत्रित केलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळी करत बांगलादेशने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. संपूर्ण मालिकेत बांगलादेशने केलेली कामगिरी पाहता भारतीय संघही बागंलादेशला कमी लेखण्याची चूक करणार नाही. आंतिम सामना जिंकून रोहित अँण्ड कंपनी विजयाची गुडी उभारणार का?  भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. मोहमद्द सिराज ऐवजी जयदेव उनाडकटला संधी देण्यात आली आहे. 



 

भारताची मालिकेतील सुरुवात निराशजनक होती. पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता, मात्र त्यानंतर जोरदार कम बॅक करत सलग तीन सामने जिंकत भारताने अंतिम फेरी गाठली. तर दुसरीकडे बांगलादेशनेही श्रीलंकेला दोनदा पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातल्या अखेरच्या सामन्यात मोठा वाद झाला होता. या वादानंतरही एका क्षणी गमावलेला सामना बांगलादेशनं जिंकला, त्यामुळे बांगलादेशचा आत्मविश्वास वाढला आहे.

भारत  - रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, जयदेव उनादकट, युजवेंद्र चहल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, वाशिंग्टन सुंदर, लोकेश राहुल  

Web Title: Rohit won the toss, India's first bowling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.