Join us  

रोहित शर्मा हा जगातील अव्वल फलंदाज, वेस्ट इंडिजच्या माजी महान क्रिकेटपटूकडून स्तुतीसुमने

काही जणांना विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ, केन विल्यम्सन किंवा जो रुट वाटत आहेत. पण वेस्ट इंडिजच्या एका महान फलंदाजाने मात्र रोहित शर्मा हा जगातील अव्वल फलंदाज आहे, असे म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 5:51 PM

Open in App
ठळक मुद्दे ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रमही रोहितच्याच नावावर आहे.एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्येही तीन द्विशतके रोहितच्याच नावावर आहे.भारताकडून ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा रोहितच्या नावावर आहेत.

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला जगामधील सर्वोत्तम फलंदाज कोण, असे प्रश्न विचारले जात आहेत. काही जणांना विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ, केन विल्यम्सन किंवा जो रुट वाटत आहेत. पण वेस्ट इंडिजच्या एका महान फलंदाजाने मात्र रोहित शर्मा हा जगातील अव्वल फलंदाज आहे, असे म्हटले आहे.

सध्याच्या घडीला रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आहे. भारताकडून ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा रोहितच्या नावावर आहेत. त्याचबरोबर ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रमही रोहितच्याच नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्येही तीन द्विशतके रोहितच्याच नावावर आहे.

वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारा म्हणाला की, " सध्याच्या घडीला क्रिकेट जगतामध्ये रोहित हा सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याची फलंदाजी पाहताना नेहमीच आनंद मिळतो. त्याच्या फलंदाजीतून अवीट आनंद मिळतो. त्यामुळे सध्याच्या घडीला तर क्रिकेट विश्वात रोहित हा सर्वोत्तम फलंदाज आहे. "

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहली