Join us  

रोहित शर्मा अखेरचे षटक हार्दिकला देणार होता, पण...

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने नाट्यमयरीत्या पुनरागमन करून चेन्नई सुपरकिंग्सला एका धावेने नमविले. यंदा मुंबईने चारही सामन्यांत चेन्नईला पराभूत करण्याचा पराक्रम करून केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 5:28 AM

Open in App

मुंबई : रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने नाट्यमयरीत्या पुनरागमन करून चेन्नई सुपरकिंग्सला एका धावेने नमविले. यंदा मुंबईने चारही सामन्यांत चेन्नईला पराभूत करण्याचा पराक्रम करून केला. अंतिम सामन्याचा नायक ठरला तो लसिथ मलिंगा. त्याने अखेरच्या षटकात टिच्चून मारा करताना चेन्नईला हार मानण्यास भाग पाडले, पण हे अखेरचे षटक मलिंगाने न टाकता हार्दिक पांड्याने टाकले असते, तर काय झाले असते? मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याच्या डोक्यात हा विचार आलेला, पण त्याने तसे केले नाही.

मुंबईच्या १४९ धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून शेन वॉटसनने अखेरपर्यंत खिंड लढवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज होती. रोहितकडे मलिंगा आणि पांड्या हे दोन पर्याय उपलब्ध होते. पांड्याने त्याच्या एका षटकात ३ धावा दिल्या होत्या, तर मलिंगाने तिसऱ्या षटकात २० धावांची खैरात केली होती. त्यामुळे अखेरचे षटक कोणाला द्यायचे, या बुचकळ्यात रोहित पडला होता. त्याचा कल पांड्याकडे झुकलेला, परंतु त्याने निर्णय बदलला व मलिंगाच्या हाती चेंडू सोपविला.

रोहित म्हणाला, ‘मलिंगा चॅम्पियन आहे. त्याने तिसºया षटकात २० धावा दिल्या होत्या, तरीही माझा त्याच्यावर संपूर्ण विश्वास होता. त्यानेही अंतिम षटकात चांगली गोलंदाजी करण्याचा विश्वास व्यक्त केला, पण एकवेळ मला हार्दिकला हे षटक द्यावे, असे वाटले होते, परंतु मलिंगाने यापूर्वीही आम्हाला असे थरराक विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे त्याला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेणे, कठीण नव्हते. कर्णधार म्हणून मी प्रत्येक सामन्यात काहीतरी नवीन शिकत आहे, पण या विजयाचे श्रेय मलिंगाला द्यायलाच पाहिजे.’

टॅग्स :आयपीएल 2019