Rohit Sharma News: भारतीय क्रिकेट संघातील बदलाचे पर्व सुरू झाले असून, युवा फलंदाज शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी रवाना झाली आहे. १९ ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होत आहे. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण २०२७ च्या विश्वचषकाची तयारी आता सुरू झाली आहे. या मालिकेत रोहित शर्माला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे, ज्यामुळे तो भारताचा महान कर्णधार सौरव गांगुली याला मागे टाकू शकतो.
रोहित शर्मा सध्या भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, तर सौरव गांगुली (११ हजार २२१ धावा) तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत केवळ ५४ धावा केल्यास, तो गांगुलीला मागे टाकेल. यासह, तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यानंतर भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सौरव गांगुली (३११ सामन्यांत ११,३६३ धावा) सध्या नवव्या स्थानावर आहे, तर रोहित शर्मा दहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या मालिकेत रोहितने जर १९५ धावा केल्या, तर तो आंतरराष्ट्रीय यादीतही गांगुलीला मागे टाकून नवव्या स्थानावर पोहोचेल.
ऑस्ट्रेलिविरुद्धच्या भारतीय संघ (एकदिवसीय)
शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार) विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
ऑस्ट्रेलिविरुद्धच्या भारतीय संघ (टी-२०)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.