Join us  

विराट, धोनीला विश्रांती, रोहितकडे कर्णधारपद

संघात युवा खेळाडूंचा भरणा...वाचा कोणाची लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 2:18 PM

Open in App

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेतील दौ-यानंतर टीम इंडिया पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्णधार विराट कोहली, एम. एस. धोनीला आराम देण्यात आला आहे. तर  मुंबईकर रोहित शर्माकडे कर्णधारपदाची आणि शिखर धवनकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  ही तिरंगी टी२० मालिका ६ ते १८ मार्चदरम्यान होणार असून, त्यात तिसरा संघ बांगलादेश असणार आहे. विजय शंकर, दिपक हूड्डा आणि ऋषभ पंत यांना 15 जणांमध्ये संधी देण्यात आली आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची आज बैठक झाली. यामध्ये अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. संघामध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह आणि कुलदिप यादव, हार्दिक पांड्या यांना आराम दिला आहे.  

असा आहे भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप-कर्णधार), केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दिपक हूड्डा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत.

 

Nidahas Trophy (T20I series)

S. No.

Date

Match

Venue

 

1

6-March

1st T20I Sri Lanka v India

Colombo

 

2

8-March

2nd T20I India v Bangladesh

Colombo

 

3

10-March

3rd T20I Sri Lanka v Bangladesh

Colombo

 

4

12-March

4th T20I Sri Lanka v India

Colombo

 

5

14-March

5th T20I Bangladesh v India

Colombo

 

6

16-March

6th T20I Sri Lanka v Bangladesh

Colombo

 

7

18-March

Final

Colombo

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंह धोनीरोहित शर्मा