Join us  

Big News : रोहित शर्माची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस

टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय ) राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 8:17 PM

Open in App

टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. त्याच्याशिवाय भारताचा सलामीवीर शिखर धवन, जलदगती गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठवली आहेत. 

रोहित शर्माने २०१९ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाच शतकं झळकावली होती. एकाच वर्ल्ड कपमध्ये पाच शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. त्याने ९ सामन्यांत ६४८ धावा चोपल्या होत्या. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) २०१९ मधील वन डे तील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविले होते. 

शिखर धवननेही अनेक दमदार खेळी केल्या आहेत. कसोटी पदार्पणात त्याने सर्वात जलद शतक ठोकले होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत दोन गोल्डन बॅट जिंकणारा तो एकमेव फलंदाज आहे. २०१८ मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार मिळवता आला नाही. 

कसोटी क्रिकेटमध्ये इशांत सध्याच्या भारतीय गोलंदाजांत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. महिला संघाची फिरकीपटू दीप्ती शर्मानेही अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड  कप स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश करून देण्यात तिचा महत्त्वाचा वाटा होता. 

टॅग्स :रोहित शर्माबीसीसीआयशिखर धवनइशांत शर्मा