हिटमॅन रोहित शर्माने पत्नी रितिकाला अशा अंदाजात केलं बर्थडे विश

हिटमॅन रोहित शर्माने त्याच्या पत्नीला वाढदिवासाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 12:31 PM2017-12-21T12:31:11+5:302017-12-21T12:33:52+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma birthday wishes to his wife | हिटमॅन रोहित शर्माने पत्नी रितिकाला अशा अंदाजात केलं बर्थडे विश

हिटमॅन रोहित शर्माने पत्नी रितिकाला अशा अंदाजात केलं बर्थडे विश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देहिटमॅन रोहित शर्माने त्याच्या पत्नीला वाढदिवासाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. कटक येथे सुरु असेलल्या टी -20 सामन्यामध्ये रोहित शर्मा व्यस्त आहे.

मुंबई- हिटमॅन रोहित शर्माने त्याच्या पत्नीला वाढदिवासाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. कटक येथे सुरु असेलल्या टी -20 सामन्यामध्ये रोहित शर्मा व्यस्त आहे. पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्यापासून दूर असण्याचं दुःख रोहितने ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. 'साधारणपणे ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो त्या व्यक्तीबरोबर राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. पण माझ्या पत्नीबरोबर तसं घडत नाही. बेकार गोष्टी नेहमी माझ्या बरोबर फिरत असतात. रितिकासारखी पत्नी असणारा व्यक्ती खूप नशिबवान आहे, असं रोहितने ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

 'साधारणपणे ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो त्या व्यक्तीबरोबर राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. पण माझ्या पत्नीबरोबर तसं घडत नाही. बेकार गोष्टी नेहमी माझ्या बरोबर फिरत असतात. रितिकासारखी पत्नी असणारा व्यक्ती खूप नशिबवान आहे. हॅप्पी बर्थडे लव्ह, असं ट्विट करत रोहित शर्माने पत्नी रितिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 



 

श्रीलंकेविरूद्धच्या वनडे सामन्यात करिअरमधील तिसरं द्विशतक लगावणारा रोहित शर्मा टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाचं नेतृत्व करतो आहे. श्रीलंकेविरूद्ध कटकमध्ये सुरू असलेल्या टी-20च्या पहिल्या सामन्यात रोहितने 17 धावा केल्या. या धावाकरून टी-20 फॉर्मेटमध्ये दीड हजार धावा करणारा बॅट्समन बनला आहे. रोहित शर्माने श्रीलंकेच्याविरोधात आधीच्या टी-20 मॅचमध्ये 1485 धावा केल्या होत्या दिड हजार धावा पूर्ण करायला रोहितला फक्त 15 धावांची गरज होती. बुधवारच्या सामन्यात 17 धावा करून रोहितने दीड हजार धावा पूर्ण केल्या आहेत. 
 

Web Title: Rohit Sharma birthday wishes to his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.