रोहित शर्मा होणार टी-20 संघाचा कर्णधार?

आयपीएलच्या इतिहासात सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माला भारताच्या टी 20 संघाचं कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 19:26 IST2017-08-10T19:18:58+5:302017-08-10T19:26:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rohit Sharma to be captain of T20 squad? | रोहित शर्मा होणार टी-20 संघाचा कर्णधार?

रोहित शर्मा होणार टी-20 संघाचा कर्णधार?

नवी दिल्ली, दि. 10 - आयपीएलच्या इतिहासात सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माला भारताच्या टी 20 संघाचं कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे. सहा सप्टेंबरला  श्रीलंकेविरोधात होणाऱ्या एकमेव टी 20 सामन्यात रोहित शर्माकडे भारतीय संघाचं कर्णधारपद देण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, नियमीत कर्णधार विराट कोहलीला आराम मिळण्यासाठी निवड समिती हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी काही दिवसांमध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक व्यस्त आहे. त्या अनुषंगाने विराट कोहलीला आराम देऊन रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त अजिंक्य रहाणेच नावही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. 
सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेवर भारतानं 2-0 असा कब्जा मिळवला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं श्रीलंकेचा एक डाव आणि 53 धावांनी दारुण पराभव केला होता.  कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 12 तारखेला खेळला जात आहे. त्यानंतर भारत आणि श्रीलंकेमध्ये पाच वनडे सामन्याची मालिका होणार आहे. त्यानंतर एकमेव टी-20 सामना होणार आहे.  रोहित शर्मानं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला 2013, 2015 आणि 2017मध्ये विजेतपद मिळवून दिलं आहे.  

सध्या सुरू असलेल्या श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाचा चार महिन्याच्या कार्यक्रमाची रुपरेषा बीसीसीआयनं जाहीर केली आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर २३ आंतराष्ट्रीय सामने खेळणार आहे. 

चार महिन्याचे भारतीय संघाचं वेळापत्रक
आॅस्ट्रेलियाविरुध्दची मालिका :
पाच एकदिवसीय : चेन्नई, बंगळुरु, नागपूर, इंदूर आणि कोलकाता.
तीन टी-२० : हैदराबाद, रांची, गुवाहाटी.
न्यूझीलंडविरुध्दची मालिका :
तीन एकदिवसीय - पुणे, मुंबई आणि कानपूर.
तीन टी-२० : नवी दिल्ली, कटक आणि राजकोट.
श्रीलंकेविरुद्धची मालिका :
तीन कसोटी : कोलकाता, नागपूर आणि नवी दिल्ली.
तीन एकदिवसीय : धर्मशाळा, मोहाली आणि विजाग.
तीन टी-२० : तरुवनंतपुरम / कोच्ची, इंदूर आणि मुंबई.

Web Title: Rohit Sharma to be captain of T20 squad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.