Join us  

वर्ल्ड कप सामन्यांची वेळ बदलण्याच्या आर अश्विनच्या कल्पनेला रोहित शर्माचा पाठिंबा; जाणून घ्या का

यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 8:14 PM

Open in App

यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ जेतेपदाच्या दावेदारांमध्ये आघाडीवर आहे आणि रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी स्पर्धा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहेत. भारतात होणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने डे-नाईट ( दिवस-रात्र) असे खेळवले जाणार आहेत आणि दुसऱ्या डावात दव फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. खेळपट्टीवर भरपूर दव असणार आहे आणि त्यात हिवाळ्यात गोलंदाजांना गोलंदाजी करणे अजूनच अवघड होणार आहे. दव फॅक्टरमुळे गोलंदाजांना चेंडूवर पकड घेण्यात अडचण जाणवणार आणि त्याचा फायदा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला अधिक होणार हे निश्चित आहे.

काय थट्टा लावली! दोन तासांत भारताचा संघ 'अव्वल'वरून झाला दुसरा; ऑस्ट्रेलियाचा नंबर पहिला

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणारी वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता भारताचा फिरकीपटू आर अश्विनने सामन्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. त्याला कर्णधार रोहित शर्माने पाठिंबा दर्शवीला आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी रोहितने पत्रकारांशी संवाद साधला अन् त्यावेळी त्याला अश्विनच्या कल्पनेबाबत विचारण्यात आले. अश्विनने वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने ११.३० वाजता सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

''ही चांगली आयडिया आहे. ही वर्ल्ड कप स्पर्धा आहे आणि तुम्ही केवळ टॉस फॅक्टवर अवलंबून राहू शकत नाही. तुम्हाला स्पर्धात्मक लढत व्हायला हवी.  मला अश्विनची कल्पना आवडली, परंतु ती प्रत्यक्षात येईल की नाही, हे माहित नाही. ब्रॉडकास्टर याबाबतच निर्णय घेतील ( रोहित हसला). दव फॅक्टरचा संघाला फायदा मिळावा, हे कुणालाच नकोय. कोणत्याही संघाला प्रकाशझोतात खेळताना दव फॅक्टरचा फायदा व्हावा, असं क्रिकेट कोणालाच नकोय,''असे रोहितने आज सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्मावर्ल्ड कप 2019आर अश्विन
Open in App