इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही केवळ क्रिकेटच्या मैदानात रंगणारी एक स्पर्धा नाही. इथं सर्वोत्तम संघ आणि खेळाडूंमधील प्रतिभाही समोर येते. आयपीएल २०२५ च्या नव्या पर्वात आणखी काही रंगतदार सामन्यांची मेजवाणी क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. IPL 2025च्या सर्वात लोकप्रिय लढतीसंदर्भातील खास माहिती जाणून घेण्यासाठी Zuplay.com वर लॉग इन करा.
१. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - कोहली विरुद्ध केकेआर
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या हंगामाला २२ मार्च रोजी कोलकाता येथील प्रतिष्ठित ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यातील ब्लॉकबस्टर लढतीने सुरुवात झाली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) ७ गडी आणि २२ चेंडू राखून पराभूत करत यंदाच्या हंगामातील मोहिमेची सुरुवात विजयाने केली. नवा कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाने दिमाखात सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.
२. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - एल क्लासिको
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातील लढत नेहमीच चर्चेचा विषय ठरते. रोहित शर्मा आता एका खेळाडूच्या रुपात मैदानात उतरल्याचे पाहायला मिळते. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात नियमित कर्णधार हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सुर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले. २३ मार्चला दोन्ही संघातील पहिल्या लढाईत चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ४ गडी राखून सामना जिंकला.
३. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - टायटन्सची लढाई
गुजरात टायटन्स (GT) संघाने आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीत ते तगडी फाईट देताना दिसते. याआधी राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसलेला जोस बटलर आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातच्या संघातून खेळताना दिसतो. संजू सॅमसनच्या संघातील १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी हा देखील लक्षवेधी खेळाडू आहे. त्यामुळे दोन्ही संघातील लढतीमधील ट्विस्ट आणखी वाढले आहे.
४. लखनौ सुपरजाएंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - पंतची रिडेम्पशन बॅटल
आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळणारा रिषभ पंत आता लखनौ संघाचा कर्णधार झाला आहे. त्यामुळे लखनौ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लढत चर्चित लढतींपैकी एक झालीये. दिल्ली कॅपिटल्स संघातील नवा कर्णधार अक्षर पटेल आणि पंतचा लखौन यांच्यातील सामना सर्वांना टीव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवणारा ठरतोय.
५. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज - द अंडरडॉग बॅटल
सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्ज (PBKS) हे दोन्ही संघ अंडरडॉग राहिले आहेत. यंदाच्या हंगामात पंजाबचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली उतरला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबाद संघाचे नेतृत्व आहे. त्याच्या नेतृत्वाखालील संघात स्फोटक फलंदाजांचा भरणा दिसून येतो. भारतीय कर्णधार आणि आयपीएलमध्ये एकमेव परदेशी कर्णधार अशा दृष्टीनेही या दोन संघातील लढत प्रेक्षणीय ठरते.
६. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-साउथर्न डर्बी
सीएसके आणि आरसीबी यांच्यातील लढतही नेहमीच लक्षवेधी ठरली आहे. दक्षिण भारतातील या दोन संघांत नेहमीच एक मनोरंजक लढत पाहायला मिळते. धोनीच्या सीएसके आणि कोहलीच्या आरसीबीमधील स्पर्धा सर्वात लोकप्रिय लढतींपैकी एक ठरते. २८ मार्च रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर त्याची झलकही पाहायला मिळाली.
७. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स - चॅम्पियन्स विरुद्ध कंटेडर्स
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाने धमाक्यात पदार्पण करताना ट्रॉफी जिंकत आपल्यातील ताकद दाखवली होती. त्यामुळे पाच वेळच्या चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या त्यांच्या लढतींना महत्त्व प्राप्त झाले आहे. गुजरातच्या संघाला चॅम्पियन करणारा हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. त्यामुळे या दोन्ही संघातील लढत आणखी लक्षवेधी ठरते.
८. राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज -नॉर्थन रायव्हल्स
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज दोन्ही संघात आक्रमक फलंदाज आणि जबरदस्त गोलंदाज आहेत. संजू सॅमसन विरुद्ध श्रेयस अय्यर असा दोन भारतीय स्टार क्रिकेटर्समधील सामना आणि उत्तरेकडील दोन संघ या अर्थानेही दोन्ही संघातील लढत लक्षवेधी ठरते.
आयपीएल २०२५ चा हंगाम रंगतदार आणि थरारक लढतींसह हाय-प्रोफाइल ट्रान्सफर, रायझिंग स्टार आणि दिग्गज खेळाडू केंद्रस्थानी असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये या स्पर्धेची उत्सुकता दिसून येते. प्रत्येक सामना आवर्जून पाहावा असा असतो. Zuplay.com सह तुम्ही लोकप्रिय आयपीएल स्पर्धेचा अनुभव अधिक समृद्ध करु शकता.
Web Title: Rivalries to Watch in IPL 2025 Mumbai Indians vs Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.