Join us  

ऋषभ पंतचा उपयोग ‘फिनिशर’सारखा व्हावा!

भुवनेश्वरला धावा रोखण्याचे तंत्र शोधावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 8:12 AM

Open in App

- सुनील गावसकरदक्षिण आफ्रिकेने पहिल्या वन डेत सहज विजय नोंदवून भारतीय थिंक टॅंकला दुसऱ्या सामन्यासाठी अंतिम एकादशबाबत गंभीर विचार करण्यास भाग पाडले. तीन सामन्यांच्या मालिकेत आव्हान टिकविण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. बरेच संघ अधिक बदल करण्यास घाबरतात, कारण हे पाऊल आत्मघाती ठरू शकते. भारताकडे मात्र प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असल्याने सध्यातरी धोक्याची घंटा वाजणार नाही. ज्या बाबी सुधारायच्या, त्यात बदल होणे अपेक्षित आहे. पहिल्या सामन्यात नव्या चेंडूवर गोलंदाजी प्रभावी जाणवली नाही. मधल्या फळीतही लय नव्हती. भुवनेश्वर आणि शार्दुल यांनी धावा मोजल्या. तथापि शार्दुलने आक्रमक अर्धशतक ठोकून भरपाई केली.  मागच्या काही सामन्यांत भुवनेश्वर अखेरच्या टप्प्यात धावा रोखण्यात अपयशी ठरल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढच्यावर्षी आपल्याच भूमीत होणाऱ्या विश्वचषकासाठी संघात स्थान टिकवायचे झाल्यास त्याला आतापासूनच धावा रोखण्याचे तंत्र शोधावे लागेल. ही मालिका आयसीसी सुपर लीगचा भाग नसल्याने पराभवामुळे पात्रतेवर परिणाम जाणवणार नाही. यजमान या नात्याने भारताला स्वाभाविक प्रवेश असेल, पण सध्याच्या भारतीय संघाला असे पराभव परवडणारे नाहीत. 

टॅग्स :रिषभ पंत
Open in App