Join us  

India vs Australia : रिषभ पंतची माघार; यष्टिरक्षकाची जबाबदारी कोणाकडे जाणार?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना शुक्रवारी राजकोट येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 9:39 AM

Open in App

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना शुक्रवारी राजकोट येथे होणार आहे. वानखेडेवर झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात यजमान भारताला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. भारतानं ठेवलेले 256 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता पार केले. डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी शतकी खेळी केली. याशिवाय टीम इंडियाला या सामन्यात आणखी एक धक्का बसला होता. यष्टिरक्षक रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला होता आणि तो मैदानावर क्षेत्ररक्षणासाठीही आला नाही. त्याच्या जागी लोकेश राहुलनं यष्टिरक्षण केले. 

पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर चेंडू पंतच्या हेल्मेटवर आदळला होता. त्यामुळे सामन्यानंतर त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्यामुळे तो मंगळवारी संघासोबत राजकोटला न जाता मुंबईतच थांबला होता.  त्याला काल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केले आणि आता तो पुढील देखरेखीसाठी बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रवाना झाला आहे. त्यामुळे पंत दुसऱ्या वन डे सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या वन डे बाबतचा निर्णय पंतच्या तंदुरुस्तीवर अबलंबून आहे.

टीम इंडियानं या मालिकेसाठी संघनिवड करताना राखीव यष्टिरक्षकाची निवड केली नव्हती. त्यामुळे पंतनं दुसऱ्या वन डेतून माघार घेतल्यानंतर यष्टिरक्षकाची जबाबदारी लोकेश राहुलकडे दिली जाऊ शकते. दरम्यान, पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेल्या 256 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता पार केले. डेव्हीड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी वैयक्तिक शतकी खेळी केली. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला राजकोटवर विजय मिळवावा लागेल. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारिषभ पंतलोकेश राहुल