Join us  

रोहित शर्माच्या मुलीचा 'बेबी सीटर' होण्यास रिषभ पंत तयार, युजवेंद्र चहलला काढला चिमटा

भारतीय यष्टिरक्षक रिषभ पंत हा बेबी सीटर म्हणून सध्या चांगलाच चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 11:41 AM

Open in App
ठळक मुद्देभारतीय यष्टिरक्षक रिषभ पंत हा बेबी सीटर म्हणून सध्या चांगलाच चर्चेत आहे.रोहित शर्मानेही त्याच्या मुलीच्या बेबी सिटींगसाठी पंतला विचारणा केली

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत ऑसी कर्णधार टीम पेननं भारतीय यष्टिरक्षक रिषभ पंत याला मस्करीत बेबी सीटर होतोस का असं विचारलं होतं. मात्र, आता पंत प्रत्यक्षात बेबी सीटर होण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्माला नुकतीच कन्यारत्न प्राप्ती झाली आणि त्यानं पंतला बेबी सिटींगसाठी विचारले. दिल्लीच्या क्रिकेटपटूनं रोहितची ही ऑफर स्वीकारली, पण तसे करताना त्याने सहकारी युजवेंद्र चहलला चिमटा काढला. 21 वर्षीय पंतने वन डे संघाचा उपकर्णधार रोहितचा मॅसेज रिट्विट करताना चहल आपले काम चोख बजावत नाही आहे का? असा प्रश्न विचारला. 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या वन डे मालिकेत पंत भारतीय संघाचा सदस्य नाही आणि त्यामुळे तो मायदेशी परतला आहे. येथे तो भारत अ संघाकडून इंग्लंड अ संघाविरुद्ध खेळणार आहे. रोहित मात्र वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे आणि त्याने पंतची फिरकी घेतली. बॉक्सिंग डे कसोटीपासून सुरू झालेला बेबी सीटिंचा किस्सा अजूनही कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि  पंत यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. पेनने यष्टीमागे टिप्पणी करताना पंतला माझ्या मुलांना सांभाळणार का? असे विचारले होते.  त्यावर पंतनेही तोडीसतोड उत्तर देत पेनला 'temporary captain' असा टोमणा हाणला होता. त्यानंतर नव वर्षाच्या पहिल्या दिवसाला भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या भेटीला गेले. तेथे पेनची पत्नी बोनीनं पंतला बेबी सीटींग करायला लावले आणि तो फोटो शेअर केला. तिने पंतला बेस्ट बेबी सीटर म्हणूनही घोषित केले. 

टॅग्स :रिषभ पंतरोहित शर्मायुजवेंद्र चहल