Join us  

IND vs ENG: पंतने मारला फटका, नंतर जे झालं त्यामुळे अँडरसननला आवरलं नाही हसू 

पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने केल्या ७ बाद ३३८ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2022 1:39 PM

Open in App

Rishabh Pant vs James Anderson: इंग्लंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या एजबॅस्टन कसोटीत भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने १०० पेक्षा कमी धावसंख्येवर पाच विकेट गमावल्या. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली यांसारखे मोठे खेळाडूही या खेळपट्टीवर अपयशी ठरले. टीम इंडिया बॅकफूटवर असताना यष्टिरक्षक रिषभ पंत आला आणि त्याने आक्रमण करण्यास सुरूवात केली. पंतने दमदार शैलीत खेळायला सुरूवात करत इंग्लंडचा सर्वोत्तम गोलंदाज जेम्स अँडरसन याच्यावर हल्लोबोल केला.

इतर खेळाडूंना फटकेबाजी अवघड जात असताना भारतीय उपकर्णधार मैदानात आला आणि त्याने तुफान फटकेबाजी केली. क्रिजवर आल्यानंतर काही वेळातच रिषभ पंतने फ्रंटफूटवर पुढे होऊन जेम्स अँडरसनच्या चेंडूवर चौकार ठोकला. हे पाहून जेम्स अँडरसनला आश्चर्य वाटले, पण नंतर जेव्हा रिषभ पंत त्याला जाऊन चौकाराबद्दल बोलला त्यावेळी मात्र अँडरसनलाही हसू आवरलं नाही.

 गंमत म्हणजे रिषभ पंतने जेम्स अँडरसनविरुद्ध हा शॉट खेळला, त्याचवेळी मैदानात बसलेल्या एका चिमुरडीचे दृश्य टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आले. ती चिमुरडी बँड वाजवत असल्याचे दिसले. सोशल मीडियावर लोकांनी या क्षणाची खूप मजा घेतली. या कसोटी मालिकेत रिषभ पंतने बॅटने विशेष कामगिरी केलेली नाही. त्याने 5 कसोटीत केवळ 150 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या या मालिकेत रिषभ पंत फ्लॉप ठरला होता, आता मालिकेची शेवटची कसोटी खेळली जात असताना त्याच्याकडून खूप आशा आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतजेम्स अँडरसनभारतीय क्रिकेट संघ
Open in App