Rishabh Pant Health Update : भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयातून ताजी माहिती अशी आहे की रिषभ पंत शस्त्रक्रियेनंतर बरा झाला आहे. यष्टीरक्षक फलंदाज प्रथमच स्वत:च्या पायावर उभा राहिला. तो केवळ काही सेकंदच उभा राहू शकला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रिषभ पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान ४ ते ६ महिन्यांचा कालावधी लागेल. याचाच अर्थ असा आहे की क्रिकेटरपटूला पुन्हा मैदानात उतरताना पाहण्यासाठी चाहत्यांना वर्षातील बहुतांश काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.पंतची आई सरोज पंत आणि बहीण साक्षी पंतसोबत रुग्णालयात उपस्थित आहेत.
- 13-01-2023- शस्त्रक्रियेनंतर रिषभ पंत काही काळ उभा राहिला.
- 12-01-2023- रिषभ पंतने शस्त्रक्रियेनंतर गुडघा हलवण्यास सुरुवात केली
- 07-01-2023: मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात रिषभ पंतच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली
मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक्सचे संचालक डॉ दिनशॉ परडीवाला यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने गुरुवारी सकाळी पंतची तपासणी केली. खेळाडूच्या सूज कमी होईपर्यंत एमआरआय किंवा शस्त्रक्रिया केली जाईल असे त्यांना वाटत नाही. रूग्णालयातील डॉक्टरांचे मत आहे की पंतच्या अस्थिबंधनाला गंभीर झीज झाली आहे आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी 8-9 महिने लागतील.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील सांगितले की, “रिषभला लवकर बरे होण्यासाठी आणि योग्य लक्ष देण्यासाठी मुंबईत आणण्यात आले. त्याला विश्रांतीची गरज आहे आणि डेहराडूनमध्ये ते शक्य नव्हते. इथे त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे आणि फक्त कुटुंबातील सदस्यच त्याला भेटू शकतील. तो त्याच्या दुखापतीतून बरा होताच, डॉक्टर त्याच्या अस्थिबंधनाच्या दुखापतीवर उपचारांची पुढील दिशा ठरवतील."
रिषभ पंतला आयसीयूमधून खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे. त्याचवेळी, डॉक्टरांनी चाहत्यांना आणि हितचिंतकांनाही त्यांना भेटणाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक, पंतला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी हे केले गेले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"