Join us  

रिषभ पंतचे दिवस भरले; आता निवड समिती अध्यक्षही बरसले

आता पंतचे दिवस भरले, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये सुरु आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 5:28 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतचा आता भारतीय संघातून पत्ता कट होऊ शकतो. कारण संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंतला वॉर्निंग दिली होती. त्यानंतरी पंतच्या खेळात सुधारणा झालेली पाहायला मिळाली नाही. आता तर निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद हे पंतवर चांगलेच बरसले आहेत. त्यामुळे आता पंतचे दिवस भरले, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये सुरु आहे.

गेल्या दहा सामन्यांमध्ये पंत नऊ वेळा आऊट झाला आहे. त्याचबरोबर सातवेळा तर त्याला दोन अंकी धावसंख्याही उभारता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यामध्ये पंतला फक्त चार धावा करता आल्या. यावेळी पंतच्यासमोर कर्णधार विराट कोहली खेळत होता. पण पंतला कोहलीबरोबर सूर जुळवून घेता आला नाही. चुकीचा फटका मारून पंत यावेळी बाद झाला. या सामन्यापूर्वी शात्री यांनी पंतला वॉर्निंग दिली होती. पण त्यानंतर पंतच्या कामगिरीमध्ये कोणताच फरक पडलेला दिसला नाही. त्यामुळे आता पंतवर कडक कारवाई करण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.

पंतबाबत प्रसाद म्हणाले की, " पंतवर किती वर्कलोड आहे, या गोष्टीचा आम्ही विश्वचषकानंतर सातत्याने विचार करत आहोत. पंतला आम्ही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये संधी दिली. पण पंतकडून सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे आता पंतसाठी बॅकअप काय असेल, कोणते खेळाडू त्याची जागा घेऊ शकतील, याचीही चाचपणी आम्ही केली आहे."रिषभ पंतचा घडा भरला, रवी शास्त्रींनी दिली वॉर्निंगभारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतचा चुकांचा घडा आता भरल्याचे दिसत आहे. कारण भारताचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी पंतला चांगलाच दम भरला आहे. यापुढे जर पंतकडून चुका होत राहील्या तर त्याला संघातून बाहेर काढण्यात येईल, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे.

शास्त्री यांनी पंतच्या चुकांचे काही दाखले दिले आहेत. शास्त्री म्हणाले की, "वेस्ट इंडिजमध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथील सामन्यात पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्याच्यासमोर कर्णधार विराट कोहली हा खेळपट्टीवर होता आणि भारतीय संघ धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी संघाला पंतच्या धावांची गरज होती. पण पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर त्याला संघात स्थान मिळणार नाही."पंतच्या गुणवत्तेबाबत शास्त्री म्हणाले की, " पंतच्या गुणवत्तेबाबत आम्हाला काहीच शंका नाही. यापूर्वीच त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. पण पंतचे शॉट सिलेक्शन चुकताना पाहायला मिळते. सामन्यामध्ये जशी परिस्थिती आहे त्यानुसार प्रत्येकाने खेळ करायचा असतो, पण हे पंतला आतापर्यंत जमलेले नाही. कारण त्याने बऱ्याच वेळा संघाच्या अपेक्षांची पूर्ती केलेली नाही. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर नक्कीच त्याचे संघातील स्थान धोक्यात आहे."

टॅग्स :रिषभ पंतरवी शास्त्री