कामगिरी सुधारायची सोडून रिषभ पंत करतोय दुबईमध्ये पार्टी; व्हिडीओ झाला वायरल

सध्या मिळालेल्या वेळात सराव करण्यापेक्षा पंत हा दुबईमध्ये पार्टी करण्यात दंग असल्याचे पाहायला मिळाले. या पार्टीचा एक व्हिडीओही चांगलाच वायरल झालेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 05:23 PM2019-12-26T17:23:01+5:302019-12-26T17:24:56+5:30

whatsapp join usJoin us
Rishabh Pant is enjoying party in Dubai after bad performance; The video has gone viral | कामगिरी सुधारायची सोडून रिषभ पंत करतोय दुबईमध्ये पार्टी; व्हिडीओ झाला वायरल

कामगिरी सुधारायची सोडून रिषभ पंत करतोय दुबईमध्ये पार्टी; व्हिडीओ झाला वायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : चांगली कमगिरी करण्यात सातत्याने अपयश येत असेल तर खेळाडू सराव करण्यावर जास्त भर देतो. पण भारताचा युवा यष्टीरक्षक मात्र बिनधास्त आहे. सातत्याने नापास होऊनही त्याला संघात स्थान मिळाल्याने तो बिनधास्त आहे. सध्या मिळालेल्या वेळात सराव करण्यापेक्षा पंत हा दुबईमध्ये पार्टी करण्यात दंग असल्याचे पाहायला मिळाले. या पार्टीचा एक व्हिडीओही चांगलाच वायरल झालेला आहे.

विश्वचषकापासून ते आता नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांमध्ये पंतला कायम संघात स्थान देण्यात आले. पण एवढ्या संधी देऊनही त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात तर पंतने तब्बल तीन झेल सोडले. त्याचबरोबर संघाला गरज असताना फक्त सात धावा करून तो बाद झाला.

सध्या ख्रिसमस सण सेलिब्रेट करायला पंत दुबईमध्ये गेला आहे. एका हॉटेलमध्ये पंत आणि त्याचे काही मित्र ख्रिसमस सेलिब्रेट करताना दिसत आहेत. खास गोष्ट म्हणजे यावेळी पंतबरोबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही दिसत आहे.

Image result for rishabh pant in dubai party

रिषभ पंत ठरतोय सतत फ्लॉप, बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

Image result for rishabh pant

भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सतत फ्लॉप ठरताना दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने तब्बल तीन झेल सोडले. त्याचबरोबर पंतला फक्त सात धावाच करता आल्या. संघाला गरज असताना पंतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने पंतबाबत एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

प्रसाद म्हणाले की, " पंतचे यष्टीरक्षण चांगले होताना दिसत नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये तो अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीत सुधारणा व्हावी, असे आम्हाला वाटते. त्यासाठी पंतसाठी एक खास प्रशिक्षक नेमण्यात येईल. यासाठी बीसीसीआयदेखील सकारात्मक आहे आणि हा मोठा निर्णय ते घेऊ शकतील."


सतत नापास होऊनही रिषभ पंतवर निवड समितीची मेहेरबानी, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने तब्बल तीन झेल सोडले. त्यानंतर चाहत्यांनी पंतला ट्रोल करत त्याला निवृत्तही केले. पण दुसरीकडे भारतीय निवड समिती पंतवर चांगलीच मेहेरबान होताना दिसत आहे. सातत्याने अपयशी ठरल्यावरसुद्धा पंतला संघात कायम ठेवण्यात आले आहे.

भारत श्रीलंकेबरोबर तीन ट्वेन्टी-२० आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाबरोबर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही संघात पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. पंतच्या निवडीमुळे चाहत्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.

भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ट्वेंटी-20 आणि वन डे संघात पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वन डे सामन्यांसाठी बीसीसीआयनं सोमवारी संघ जाहीर केला. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर शिखर धवनची ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत वापसी झाली आहे. रोहित व शमी ट्वेंटी-20 मालिकेत खेळणार नाही.

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मानं 2019 वर्ष गाजवलं. भारताच्या मर्यादित षटकाच्या संघाचा उपकर्णधार रोहितनं कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. 2019 या कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित शर्मा 1490 धावांसह आघाडीवर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यानं पाच शतकं झळकावली होती. ट्वेंटी-20तही त्यानं समाधानकारक कामगिरी केली आहे. रोहित एक वर्ष सातत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. 

Web Title: Rishabh Pant is enjoying party in Dubai after bad performance; The video has gone viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.