Join us  

पराभवासाठी केवळ ऋषभ दोषी नाही

गावसकर : सनरायजर्स विजयाची लय कायम राखेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 7:00 AM

Open in App

दुबई : भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवासाठी युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतची पाठराखण केली. ऋषभसोबत अन्य खेळाडूही पराभवासाठी सारखेच जबाबदार असल्याचे गावस्कर म्हणाले. मंगळवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली संघाला विजयासाठी १६३ धावांची गरज होती, पण त्यांचा डाव २० षटकांत ७ बाद १४७ धावांत रोखल्या गेला.दिल्लीच्या पराभवावर टिप्पणी करताना गावस्कर म्हणाले, ‘ऋषभ पंतने सामना जिंकून देणारी खेळी करायला पाहिजे होती, हे जरी खरे असले तरी याचा अर्थ अन्य फलंदाजांना जबाबदारी झटकता येणार नाही. संघाच्या विजयासाठी त्यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची आहे.’

गावसकर यांनी सनरायझर्सला पहिला विजय मिळवून देण्यासाठी अनुभवी जॉनी बेयरस्टोच्या (५३) कामगिरीची प्रशंसा केली. त्याचसोबत युवा फिरकीपटू राशिद खानला विजयाचा हीरो असल्याचे संबोधले. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स संघ विजयाची लय कायम राखेल, अशी आशा गावसकर यांनी व्यक्त केली.

कोहलीमुळे क्रिकेटप्रति विचार बदललाराजस्थान रॉयल्सचा यष्टिरक्षक फलंदाज सध्या आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेत आहे. त्याबाबत बोलताना सॅमसन म्हणाला की विराटमुळे खेळाप्रति विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला. सॅमसन व कोहली यांच्यादरम्यान जिममध्ये चर्चा झाली होती. सॅमसन भारतीय संघात असताना जिममध्ये एक्सरसाईजदरम्यानची ही घटना आहे. संजी म्हणाला, ‘मी जिममध्ये विराटसोबत ट्रेनिंग करीत होतो. फिटनेससाठी एवढी एनर्जी कशाला खर्च करतो, असे मी त्याला विचारत होतो.

टॅग्स :आयपीएलसुनील गावसकर