Rinku Singh Score on Hand, IPL 2022 KKR vs RR: सामना सुरू होण्याआधीच रिंकू सिंगने हातावर लिहिला स्कोअर? पाहा काय घडलं...

कोलकाताच्या विजयात रिंकू सिंगचा मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 07:46 PM2022-05-03T19:46:10+5:302022-05-03T19:46:41+5:30

whatsapp join usJoin us
Rinku Singh had written score on his hands before the start of the match watch video IPL 2022 KKR vs RR Trending on social media | Rinku Singh Score on Hand, IPL 2022 KKR vs RR: सामना सुरू होण्याआधीच रिंकू सिंगने हातावर लिहिला स्कोअर? पाहा काय घडलं...

Rinku Singh Score on Hand, IPL 2022 KKR vs RR: सामना सुरू होण्याआधीच रिंकू सिंगने हातावर लिहिला स्कोअर? पाहा काय घडलं...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rinku Singh Score on Hand, IPL 2022 KKR vs RR: राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सने शेवटच्या षटकात विजय मिळवला. नितीश राणा आणि रिंकू सिंग या दोन फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आणि कोलकाता तब्बल पाच पराभवांनंतर विजय मिळवून दिला. या सामन्यात राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने दमदार अर्धशतक ठोकले, तर KKRकडून रिंकू सिंगने दमदार फलंदाजी केली. या सामन्यानंतरच्या एका व्हिडीओमध्ये रिंकू सिंग बद्दलची एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली.

कोलकाताने विजय मिळवल्यानंतर नितीश राणाने रिंकू सिंगची छोटीशी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्याने रिंकू विचारलं की तू हातावर काय लिहिलंय? रिंकू म्हणाला मी हातावर ५० असा आकडा लिहून त्याभोवत हार्टचा आकार काढला होता. सामना सुरू होण्याच्या आधीच मी हे लिहिलं होतं. मला सामना जिंकवायचा होता. त्यामुळे दमदार खेळी करण्याची माझी इच्छा होती. अखेर पाच डावानंतर ती खेळी माझ्याकडून खेळली गेली.

दरम्यान, सामना जिंकवून देताना रिंकूला अर्धशतक झळकावता आलं नाही. पण त्याने नाबाद ४२ धावा केल्या. १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रिंकूशिवाय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने ३२ चेंडूत ३४ धावा केल्या. तर नितीश राणाने नाबाद ४८ धावा केल्या. तत्पूर्वी, राजस्थानने प्रथम फलंदाजी केली. त्यांच्याकडून सलामीवीर देवदत्त पडिक्कल (२) आणि जोस बटलर (२२) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर संजू सॅमसनने ४९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ५४ धावा केल्या. तसेच अखेरच्या टप्प्यात शिमरॉन हेटमायरने २७ धावा करत संघाला १५२ धावांपर्यंत मजल मारून दिली.

Web Title: Rinku Singh had written score on his hands before the start of the match watch video IPL 2022 KKR vs RR Trending on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.