Join us  

ट्वेन्टी-२० त 'तीनशे'पार! ९ चेंडूत फिफ्टी अन् ३४ चेंडूत शतक; २ फलंदाजांचा कहर

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक बनविण्याचा विक्रम यापूर्वी टीम इंडियाच्या रोहित शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 8:53 AM

Open in App

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देऊन आज नवीन विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. एकीकडे भारतीय क्रिकेटर्स रेकॉर्ड रचत असताना नेपाळच्या फलंदाजाने कर्णधार रोहित शर्माचा वेगवान शतकाचा विक्रम मोडला. आशियाई स्पर्धा २०२३ मधील क्रिकेट सामन्यात नेपाळच्या कुशल मल्लाने ३४ चेंडूत सर्वात वेगवान शतक बनवण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका धुव्वादार फलंदाजाची एंट्री झाल्याचं क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळालं. 

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक बनविण्याचा विक्रम यापूर्वी टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि द. आफ्रिकेच्या डेविड मिलरच्या नावे होता. मात्र, नेपाळच्या तरुण तडफदार कुशल फलंदाजाने दोन्ही दिग्गजांचा विक्रम मोडीत काढत स्वत:च्या नावार रेकॉर्ड केलाय. कुशलने ५० चेंडूत नाबाद १३७ धावा केल्या आहेत. त्यात, १२ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश आहे. तर, दिपेंद्र सिंह ऐरी यानेही केवळ ९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलंय. त्यामुळे, आशियाई स्पर्धेतील मैदानावर दोन युवा खेळाडूंच्या फलंदाजीचा कहर पाहायला मिळाला.   

विशेष म्हणजे आशियाई स्पर्धेतील याच सामन्यात टी-२० मध्ये ३०० धावांचा टप्पा पार पडण्याच्या नवीन विक्रमाचीही नोंद झालीय. नेपाळ आणि मंगोलिया देशांत हा सामना पार पडला. त्यामध्ये, नेपाळने २० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्या ३१४ धावांचा हिमालय उभारला.  

टी-२० सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक

९  चेंडू - दिपेंद्र सिंग (आज)*१२ चेंडू - युवराज सिंग १२ चेंडू - मिर्झा एहसान 

टी०२० सामन्यात सर्वात वेगवान शतक

३४ चेंडू - कुशल मल्ला (आज)*३५ चेंडू - रोहित शर्मा ३५ चेंडू - डेविल मिलर 

टॅग्स :आशियाई स्पर्धा २०२३रोहित शर्माचीनटी-२० क्रिकेट