Join us  

Video : RCB च्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या खेळाडूला मस्ती नडली, ४ सामन्यांची बंदी 

बिग बॅश लीगमधील सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळणाऱ्या टॉमला ४ सामन्यांच्या बंदीची शिक्षा झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 7:59 PM

Open in App

IPL 2024 Auction  (Marathi News)  - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी झालेल्या लिलावात पर्समध्ये २३ कोटी रुपये असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अल्झारी जोसेफ ( ११.५० कोटी), यश दयाल ( ५ कोटी), ल्युकी फर्ग्युसन ( २ कोटी), टॉम कुरन ( १.५० कोटी), सौरव चौहान ( २० लाख), स्वप्निल सिंग ( २० लाख) यांना ताफ्यात दाखल करून घेतले. RCB च्या संघात नव्याने दाखल झालेल्या टॉम कुरनला ( Tom Curran) मस्ती नडली. बिग बॅश लीगमधील सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळणाऱ्या टॉमला ४ सामन्यांच्या बंदीची शिक्षा झाली आहे. 

सिडनी सिक्सर्सचा अष्टपैलू खेळाडू, टॉम कुरन, बिग बॅश लीग (BBL) खेळापूर्वी अंपायरशी भांडण केल्याबद्दल चार सामन्यांची बंदी घातली. ळे त्याला महत्त्वपूर्ण धक्का बसला आहे. २८ वर्षीय इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेअंतर्गत "लेव्हल ३" गुन्ह्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे संघाला निलंबनाची घोषणा करावी लागली. लॉन्सेस्टन येथे ११ डिसेंबर रोजी होबार्ट हरिकेन्स विरुद्ध सिक्सर्सच्या सामन्यासाठी सराव सत्रादरम्यान कुरनचा अधिकारीसोबत वाद झाला.

पंचांच्या सूचनेविरुद्ध कुरनने खेळपट्टीवर सराव करताना धाव घेतली.  पंचांनी ताकीद देऊनही तो ऐकला नाही आणि पुन्हा खेळपट्टीवर रन अप घेत आला. यावेळी त्याची व पंचाची टक्कर होता होता राहिली.  "फुटेजमध्ये कुरन अम्पायरला दूर जाण्याचा इशारा करताना दिसला... त्यानंतर त्याने सराव रन-अप करण्याचा प्रयत्न केला आणि कुरनच्या समोर बॉलिंग क्रिझमध्ये उभ्या असलेल्या अम्पायरच्या दिशेने वेगाने धावण्याचा प्रयत्न केला," असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.  

  

टॅग्स :बिग बॅश लीगरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरऑफ द फिल्ड