Join us  

RCB vs SRH, IPL 2018 : ... कसे झाले हैदराबादच्या विजयाचे सेलिब्रेशन... पाहा व्हीडीओ

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर हैदराबादने पाच धावांनी विजय मिळवला. या विजयासह हैदराबादचे 16 गुण झाले असून त्यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 8:04 PM

Open in App
ठळक मुद्देगोलंदाजीच्या जीवावर आम्ही सामने जिंकू शकतो, हे सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा दाखवून दिले.

... कसे झाले हैदराबादच्या विजयाचे सेलिब्रेशन... पाहा व्हीडीओ

 

हैदराबाद अव्वल स्थानी कायम; बंगळुरुवर पाच धावांनी मात

हैदराबाद : गोलंदाजीच्या जीवावर आम्ही सामने जिंकू शकतो, हे सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा दाखवून दिले. केन विल्यम्सनच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने 146 धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने 39 धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर हैदराबादने पाच धावांनी विजय मिळवला. या विजयासह हैदराबादचे 16 गुण झाले असून त्यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे.

11.37 PM : हैदराबादचा बंगळुरुवर पाच धावांनी विजय

11.36 PM : बंगळुरुला विजयासाठी एका चेंडूत 6 धावांची गरज

11.36 PM : बंगळुरुला विजयासाठी 2 चेंडूंत 7 धावांची गरज

11.35 PM : बंगळुरुला विजयासाठी 3 चेंडूंत 8 धावांची गरज

11.32 PM : बंगळुरुला विजयासाठी 6 चेंडूंत 12 धावांची गरज

- सिद्धार्थ कौलने 19व्या षटकात भेदक गोलंदाजी करत सात धावा दिल्या. त्यामुळे  बंगळुरुला विजयासाठी 6 चेंडूंत 12 धावांची आवश्यकता होती.

11.24 PM : बंगळुरु विजयासाठी 12 चेंडूंत 19 धावांची गरज

- कॉलिन डी ग्रँडहोम आणि मनदीप सिंग यांनी संघाला सावरले. त्यामुळे बंगळुरुला विजयासाठी 12 चेंडूंत 19 धावांची गरज होती.

11.08 PM : बंगळुरु पंधरा षटकांत 5 बाद 102

10.54 PM : मोईन अली OUT; बंगळुरुला पाचवा धक्का

- सिद्धार्थ कौलने हंगामात पहिलाच सामना खेळणाऱ्या मोईन खानला बाद केले. बंगळुरुसाठी हा पाचवा धक्का होता.

10.51 PM : एबी डी'व्हिलियर्स OUT; बंगळुरुला मोठा धक्का

- रशिद खानने अकराव्या षटकात एबी डी'व्हिलियर्सला बाद करत बंगळुरुला मोठा धक्का दिला.

10.42 PM : कोहली OUT; बंगळुरुला मोठा धक्का

- शकिब अल हसनने कोहलीला बाद करत बंगळुरुला मोठा धक्का दिला. कोहलीने 30 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 39 धावा केल्या.

10.31 PM : बंगळुरुला दुसरा धक्का; मनन व्होरा बाद

- संदीप शर्माने मनन व्होराला त्रिफळाचीत करत बंगळुरुला दुसरा धक्का दिला.

10.20 PM :  सहाव्या षटकात बंगळुरुचे अर्धशतक पूर्ण

10.19 PM : कोहली तळपला; पाचव्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार

10.10 PM : बंगळुरुला पहिला धक्का; पार्थिव पटेल बाद

 - शकिब अल हसनने पार्थिवला पायचीत पकडत बंगळुरुला पहिला धक्का दिला. पार्थिवने 13 चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर 20 धावा केल्या.

विल्यसमनच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदरबादची 146 धावांपर्यंत मजल

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादला कर्णधार केन विल्यम्सनच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेजर्स बंगळुरुपुढे 147 धावांचे आव्हान ठेवता आले. विल्यम्सन आणि शकिब अल हसन यांना वगळता हैदराबादच्या अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच हैैदराबादला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. विल्यम्सनने 39 चेंडूंत पाच चैकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. शकिबने 35 धावा करत विल्यम्सनला चांगली साथ दिली. बंगळुरुकडून उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा करत प्रत्येकी तीन फंलंदाजांना बाद केले.

9.40 PM : हैदराबादचे बंगळुरुपुढे 147 धावांचे आव्हान

9.39 PM : संदीप शर्मा पायचीत; हैदराबाद सर्वबाद 146

- डावाच्या अखेरच्या चेंडूवर संदीप शर्मा धावचीत झाला. 

9.38 : सिद्धार्थ कौल धावचीत

- हैदराबादच्या सिद्धार्थ कौल धावचीत होत आत्मघात केला. त्याला फक्त एकच धाव करता आली.

9.37 PM : रशिद खान धावबाद; हैदराबादला आठवा धक्का

- दुसरी धाव घेण्याच्या नादात रशिद खान धावबाद झाला. कोहलीने पार्थिव पटेलकडे चेंडू टाकत रशिदला धावबाद केले.

9.35 PM : वृद्धिमान साहा बाद; हैदराबादला सातवा धक्का

सिराजने 19व्या पठाणला बाद केल्यानंतर वृद्धिमान साहालाही तंबूत धाडले. साहाने एका षटकाराच्या जोरावर 8 धावा केल्या.

9.31 PM : हैदराबादला सहावा धक्का; युसूफ पठाण त्रिफळाचीत

- मोहम्मद सिराजने 19व्या षटकात युसूफ पठाणला त्रिफळाचीत हैदराबादला सहावा धक्का दिला. पठाणने दोन चौकारांच्या जोरावर 12 धावा केल्या.

9.27 PM : शकिब अल हसन बाद; हैदराबादला पाचवा धक्का

- टीम साऊथीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात शकिब अल हसन बाद झाला. शकिबने पाच चौकारांच्या जोरावर 35 धावा केल्या.

9.17 PM :  हैदराबादला मोठा धक्का; केन विल्यम्सन OUT

- अर्धशतक झळकावून संघाला सावरणाऱ्या केन विल्यम्सनला उमेश यादवने बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. विल्यम्सनने 39 चेंडूंत पाच चैकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या.

9.10 PM : हैदराबाद 15 षटकांत 3 बाद 115

- विल्यम्सनला शकिब अल हसनने सुरेख साथ दिल्यामुळे हैदराबादला पंधरा षटकांत 115 धावा करता आल्या.

9.02 PM : केन विल्यम्सनचे अर्धशतक पूर्ण

- विल्यम्सनने एकेरी धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. विल्यम्सनचे आयपीएलमधले हे पाचवे शतक ठरले.

8.59 PM : केन विल्यम्सनच्या षटकारासह हैदराबाचे शतक पूर्ण

- विल्यम्सनने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर षटकार लगावत संघाचे शतक पूर्ण केले.

8.46 PM : हैदराबाद दहा षटकांत 3 बाद 61

- हैदराबादचे तीन फलंदाज बाद झाले असले तरी कर्णधार केन विल्यम्सनने संघाला सारवले. केनच्या दमदार खेळीमुळे हैदराबादला 10 षटकांत 61 धावा करता आल्या.

8.37 PM :  मनीष पांडे OUT; हैदराबादला तिसरा धक्का

- युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर विराट कोहलीला सोपा झेल देऊन मनीष पांडे तंबूत परतला. मनीषने सात चेंडूंत पाच धावा केल्या.

8.26 PM : हैदराबादला दुसरा धक्का; शिखर धवन बाद

- मोहम्मद  सिराजने हैदराबादचा सलामीवीर शिखर धवनला बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. धवनने 19 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने 13 धावा केल्या.

8.21 PM : हैदराबाद पाच षटकांत 1 बाद 36

- हैदराबादचा सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यम्सन यांनी संयतपणे फलंदाजी करत संघाला पाच षटकांत 37 धावांपर्यंत मजल मारून दिली.

8.10 PM : हैदराबादला पहिला धक्का; अॅलेक्स हेल्स बाद

- बंगळुरुचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने अॅलेक्स हेल्सला त्रिफळाचीत करत हैदराबादला पहिला धक्का दिला. हेल्सने एका चौकाराच्या मदतीने पाच धावा केल्या.

अव्वल स्थानी असलेल्या हैदराबादच्या संघाचा पाहा कसा होतो सराव

 

7.45 PM : बंगळुरुने दिले मोईन अलीला संघात स्थान

7.30 PM : नाणेफेक जिंकून बंगळुरुने गोलंदाजी स्वीकारली

 

पराभवाचा दुष्काळ कोहली संपवणार का... आज हैदराबादविरुद्ध सामना

हैदराबाद : आतापर्यंतच्या नऊ सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. सोमवारी त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादबरोबर होणार असून या सामन्यात बंगळुरु पराभवाचा दुष्काळ संपवणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. दुसरीकडे हैदराबादचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. बंगळुरुविरुद्धच्या या सामन्यात विजय मिळवून अव्वल स्थान कायम राखण्याचे त्यांचे ध्येय असेल. 

 

दोन्ही संघ

 

टॅग्स :आयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादविराट कोहली