Join us  

RCB vs RR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहज विजय; विराट-देवदत्तची फटकेबाजी

RCB vs RR Latest News & Live Score :  राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातल्या सामन्यात RCBने बाजी मारली. 

By स्वदेश घाणेकर | Published: October 03, 2020 2:55 PM

Open in App

RCB vs RR Latest News & Live Score राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातल्या सामन्यात RCBने बाजी मारली.  Indian Premier League ( IPL 2020) मधील दिवसा खेळवला जाणारा हा पहिलाच सामना आहे. राजस्थान रॉयल्सचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर महिपाल लोम्रोर याने सावध खेळ करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. युजवेंद्र चहलनं (  Yuzvendra Chahal) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. निराशाजनक कामगिरीनंतर RCBचा डाव देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि विराट कोहली  (Virat Kohli) यांनी सावरला. RCBनं हा सामना सहज जिंकला. 

RCB vs RR Latest News & Live Score :

देवदत्त 63 धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराटनं अखेरपर्यंत खिंड लढवून RCBचा विजय पक्का केला. RCBनं 8 विकेट राखून हा सामना जिंकला. विराट 53 चेंडूंवर 72 धावांवर नाबाद राहिला.  

- धावांचा पाठलाग करताना RCBचा सलामीवीर आरोन फिंच लगेल माघारी परतला, परंतु युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली यांनी दमदार खेळ केला. देवदत्तानं 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर विराटनेही 41 चेंडूंत 50 धावा केल्या. IPLमधील 8 डावांनंतर विराटनं अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे IPLमधील 37वे अर्धशतक ठरले. विराट-देवदत्तची 99 धावांची भागीदारी जोफ्रा आर्चरने तोडली. देवदत्त 63 धावांवर माघारी परतला.

रियान पराग आणि पहिलाच सामना खेळणाऱ्या लोम्रोर या युवा खेळाडूंनी सावध खेळ करताना RRला शंभरी पार करून दिली. पण, या दोघांची 35 धावांची भागीदारी 16व्या षटकात संपुष्टात आली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पराग ( 16) माघारी परतला. पुढच्याच षटकात लोम्रोरही माघारी परतला. पण, त्यानं त्याची कामगिरी चोख बजावली. 1 चौकार व 3 षटकारांसह 39 चेंडूंत 47 धावा करणाऱ्या लोम्रोरला चहलने बाद केले. राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यांनी अखेरच्य षटकात हल्लाबोल चढवला अन् RRनं 6 बाद 154 धावा केल्या. टेवाटिया आणि आर्चर यांनी 21 चेंडूंत नाबा 40 धावा चोपल्या. टेवाटियानं 3 षटकार खेचून नाबाद 24,तर आर्चरनं 16 धावा केल्या.  

- रियान पराग आणि पहिलाच सामना खेळणाऱ्या लोम्रोर या युवा खेळाडूंनी सावध खेळ करताना RRला शंभरी पार करून दिली. पण, या दोघांची 35 धावांची भागीदारी 16व्या षटकात संपुष्टात आली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पराग ( 16) माघारी परतला. 

- युजवेंद्र चहलनंही पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अफलातून रिटर्न कॅच घेतली. पण, चहलनं टीपलेला चेंडू जमिनीला टेकला होता, त्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. चहलच्या चेंडूवर फटका मारताना संजू सॅमसन ( Sanju Samson) झेलबाद झाला. राजस्थानचे तीन फलंदाज 31 धावांवर माघारी परतले. रॉबिन उथप्पावर आज त्याच्या अनुभवाची उपयोग करून RRचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. त्याच्या जोडीला पदार्पणवीर महिपाल लोम्रोर होता. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी सावध खेळ करून RRची धावसंख्या वाढवली. पण, 11व्या षटकात उथप्पा माघारी परतला. युजवेंद्र चहलनं त्याला ( 17) इसुरू उदानाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. 

- पुढच्याच षटकात विराट कोहलीनं चेंडू नवदीप सैनीच्या हाती सोपवला आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिले. सैनीनं टाकलेला चेंडू जोस बटलरच्या बॅटची कड घेऊन स्लीपच्या दिशेनं गेला अन् पहिल्या स्लीपमध्ये सुरेख झेल घेत RRला दुसरा धक्का दिला. बटलर 22 धावांवर माघारी परतला. 

 तिसऱ्या षटकात RCBला नशीबानं पहिले यश मिळवून दिले. इसुरू उडानाच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात स्मिथच्या बॅटनं इनसाईट एज घेतला आणि चेंडू यष्टींवर आदळला. स्मिथ 5 धावा करू शकला. 

- राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलर ( Jos Buttler) आणि स्मिथ यांनी RRच्या डावाची सावध सुरुवात केली. अंकित राजपूतच्या जागी RRनं आज महिपाल लोमरोर याला संधी दिली आहे. 

राजस्थान । विदेशी खेळाडूंसह संघाचा समतोल साधल्या गेला. संजू सॅमसन, जोस बटलर यांची उपस्थिती. स्टीव्ह स्मिथचे कुशल नेतृत्व.आरसीबी । डिव्हिलियर्सचा शानदार फॉर्म. वॉशिंग्टन सुंदरकडून गोलंदाजीची सुरुवात करण्याची रणनीती यशस्वी. अ‍ॅरोन फिंच फॉर्मात. गेल्या लढतीतील विजयामुळे संघात उत्साह.

राजस्थान । शारजाहच्या छोट्या मैदानावर संघ यशस्वी, पण दुबईतील मोठ्या मैदानावर संघ पराभूत. अबुधाबीमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान.आरसीबी। कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय. क्षेत्ररक्षण लौकिकानुसार नाही. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी चिंतेचा विषय. 

टॅग्स :IPL 2020राजस्थान रॉयल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर