Join us

RCB vs RR Latest News : RCBचा गोलंदाज नवदीप सैनीच्या बुटांनी वेधले लक्ष; लिहिलंय असं काहीतरी...

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात आज सामना अबु धाबी येथे रंगत आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: October 3, 2020 18:35 IST

Open in App

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात आज सामना अबु धाबी येथे रंगत आहे. Indian Premier League ( IPL 2020) मधील दिवसा खेळवला जाणारा हा पहिलाच सामना आहे. राजस्थान रॉयल्सचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर महिपाल लोम्रोर याने सावध खेळ करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. युजवेंद्र चहलनं (  Yuzvendra Chahal) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. राहुल टेवाटिया आणि जोफ्रा आर्चर यांनी अखेरच्या षटकांत हल्लाबोल केला. 

राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलर ( Jos Buttler) आणि स्मिथ यांनी RRच्या डावाची सावध सुरुवात केली. पण, RRचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले. रियान पराग आणि पहिलाच सामना खेळणाऱ्या महिपाल लोम्रोर या युवा खेळाडूंनी सावध खेळ करताना RRला शंभरी पार करून दिली. पराग ( 16) माघारी परतला. लोम्रोरही 1 चौकार व 3 षटकारांसह 39 चेंडूंत 47 धावा करून बाद झाला.  राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यांनी अखेरच्य षटकात हल्लाबोल चढवला अन् RRनं 6 बाद 154 धावा केल्या. टेवाटिया आणि आर्चर यांनी 21 चेंडूंत नाबा 40 धावा चोपल्या. टेवाटियानं 3 षटकार खेचून नाबाद 24,तर आर्चरनं 16 धावा केल्या. 

युजवेंद्र चहलनं 4 षटकांत 24 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. इसुरू उदानाने दोन, तर नवदीप सैनीनं 1 विकेट घेतली. या सामन्यात सैनीच्या बुटावर लिहिलेल्या शब्दांनी सर्वांचे लक्ष वेधले. सैनीच्या बुटांवर “F**k it! Bowl fast” असे लिहिले आहे. 

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स