Join us  

RCB vs RR Latest News : IPLमध्ये 8 इनिंगनंतर विराट कोहलीनं झळकावलं अर्धशतक, मोडला रोहित शर्माचा 'टॉप'चा विक्रम

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात आज सामना अबु धाबी येथे रंगत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 03, 2020 7:02 PM

Open in App

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात आज सामना अबु धाबी येथे रंगत आहे. Indian Premier League ( IPL 2020) मधील दिवसा खेळवला जाणारा हा पहिलाच सामना आहे. राजस्थान रॉयल्सचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर महिपाल लोम्रोर याने सावध खेळ करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. युजवेंद्र चहलनं (  Yuzvendra Chahal) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. निराशाजनक कामगिरीनंतर RCBचा डाव देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि विराट कोहली  (Virat Kohli) यांनी सावरला. 

देवदत्त पडीक्कलचं अर्धशतक; नोंदवला भल्याभल्यांना न जमलेला विक्रम

राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलर ( Jos Buttler) आणि स्मिथ यांनी RRच्या डावाची सावध सुरुवात केली. पण, RRचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले. रियान पराग आणि पहिलाच सामना खेळणाऱ्या महिपाल लोम्रोर या युवा खेळाडूंनी सावध खेळ करताना RRला शंभरी पार करून दिली. पराग ( 16) माघारी परतला. लोम्रोरही 1 चौकार व 3 षटकारांसह 39 चेंडूंत 47 धावा करून बाद झाला.  राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यांनी अखेरच्य षटकात हल्लाबोल चढवला अन् RRनं 6 बाद 154 धावा केल्या. टेवाटिया आणि आर्चर यांनी 21 चेंडूंत नाबा 40 धावा चोपल्या. टेवाटियानं 3 षटकार खेचून नाबाद 24,तर आर्चरनं 16 धावा केल्या.  

देवदत्त पडीक्कलचा अफलातून झेल; जोस बटलरलाही बसला नाही विश्वास, Video

धावांचा पाठलाग करताना RCBचा सलामीवीर आरोन फिंच लगेल माघारी परतला, परंतु युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली यांनी दमदार खेळ केला. देवदत्तानं 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर विराटनेही 41 चेंडूंत 50 धावा केल्या. IPLमधील 8 डावांनंतर विराटनं अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे IPLमधील 37वे अर्धशतक ठरले. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्याचे हे 69 वे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह त्यानं रोहित शर्माचा ( Rohit Sharma) विक्रम मोडला.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारे फलंदाजविराट कोहली - 69 अर्धशतकंरोहित शर्मा - 68शिखर धवन - 54गौतम गंभीर - 53सुरेश रैना - 52 

टॅग्स :IPL 2020विराट कोहलीरोहित शर्मारॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स