Join us  

RCB vs KKR Latest News : IPL मध्ये कोणत्याच गोलंदाजाला न जमलेला पराक्रम मोहम्मद सिराजनं केला; KKRचे चार फलंदाज 14 धावांवर माघारी Video

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात परतीचा सामना सुरू झाला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 21, 2020 8:01 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात परतीचा सामना सुरू झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, मोहम्मद सिराजनं त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. KKRचे चार फलंदाज अवघ्या 14 धावांवर माघारी परतले होते. सिराजनं सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स घेतल्या.  राहुल त्रिपाठीला दुसऱ्याच षटकात बाद करून मोहम्मद सिराजनं RCBला पहिले यश मिळवून दिले. KKRला 3 धावांवर पहिला धक्का बसला. पुढच्याच चेंडूवर नितिश राणाचा त्रिफळा उडवून सिराजनं KKRला मोठा हादरा दिला. टॉम बँटननं त्याला हॅटट्रिक होऊ दिली नाही. पण, पुढील षटकात नवदीप सैनीनं ती कसर भरून काढली. शुबमन गिल ( 1) झेलबाद झाल्यानं KKRची अवस्था 3 बाद 3 धावा अशी झाली. कोलकाताचं विकेट पडण्याचं सत्र काय राहिले. सिराजनं चौथ्या षटकांत टॉम बँटनला ( 10) झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानं 2 षटकांत एकही धाव न देता 3 विकेट्स घेतल्या. आयपीएल इतिहासात एका सामन्यात दोन निर्धाव षटकं टाकणारा तो पहिला गोलंदाज ठरला. आंद्रे रसेलला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी संघात टॉम बँटन याला स्थान दिले आहे. याशिवाय शिवम मावीच्या जागी प्रसिध कृष्णा याची एन्ट्री झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स 10 एप्रिल 2012नंतर प्रथमच सुनील नरीन आणि आंद्रे रसेल या दोन्ही खेळाडूंशिवाय मैदानावर उतरणार आहेत. 2012 मध्ये RCBविरुद्ध ही जोडी सामन्याला मुकली होती आणि आज पुन्हा RCBविरुद्धच त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. या कालावधीत KKR नरीन किंवा रसेल यांच्यापैकी एकाचा तरी अंतिम 11मध्ये सहभाग ठेवत 129 सामने खेळले आहेत.  

आंद्रे रसेलला यंदाच्या मोसमात 9 सामन्यांत 92 धावा करता आल्या आहेत आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत. नरीनने 6 सामन्यांत 44 धावा केल्या, तर 4 विकेट्स घेतल्या. 

कोलकाता नाईट रायडर्स - शुबमन गिल, टॉम बँटन, नितिश राणा, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, राहुल त्रिपाठी, पॅट कमिन्स, ल्युकी फर्ग्युसन, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्थी. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - देवदत्त पडीक्कल, आरोन फिचं, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकिरत सिंग मान, वॉशिंग्टन सुंदर, ख्रिस मॉरिस, मोहम्मद सिराज, इसुरू उदाना, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल.  

आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटकं कुणी टाकली?प्रविण कुमार - 14इरफान पठाण - 10धवल कुलकर्णी - 8लसिथ मलिंगा - 8संदीप शर्मा - 8   

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स