Join us  

RCB vs KKR Latest News : RCBच्या गोलंदाजांसमोर कोलकाता नाईट रायडर्सची दैना 

RCB vs KKR Latest News :  Indian Premier League ( IPL 2020) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाच्या गोलंदाजांनी कमालच केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) फलंदाजांना त्यांनी झटपट गुंडाळले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 21, 2020 9:10 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाच्या गोलंदाजांनी कमालच केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) फलंदाजांना त्यांनी झटपट गुंडाळले. KKRनं नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, मोहम्मद सिराजनं त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. KKRचे चार फलंदाज अवघ्या 14 धावांवर माघारी परतले होते. सिराजनं सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स घेतल्या. सिराजचा झंझावात इथेच थांबला नाही. RCBच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात कोलकाताची दैना उडवली. 

राहुल त्रिपाठीला दुसऱ्याच षटकात बाद करून मोहम्मद सिराजनं RCBला पहिले यश मिळवून दिले. KKRला 3 धावांवर पहिला धक्का बसला. पुढच्याच चेंडूवर नितिश राणाचा त्रिफळा उडवून सिराजनं KKRला मोठा हादरा दिला. टॉम बँटननं त्याला हॅटट्रिक होऊ दिली नाही. पण, पुढील षटकात नवदीप सैनीनं ती कसर भरून काढली. शुबमन गिल ( 1) झेलबाद झाल्यानं KKRची अवस्था 3 बाद 3 धावा अशी झाली. कोलकाताचं विकेट पडण्याचं सत्र काय राहिले. सिराजनं चौथ्या षटकांत टॉम बँटनला ( 10) झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानं 2 षटकांत एकही धाव न देता 3 विकेट्स घेतल्या. 

आयपीएल इतिहासात एका सामन्यात दोन निर्धाव षटकं टाकणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्यात ख्रिस मॉरिसनंही एक षटक निर्धाव टाकले. आयपीएलच्या इतिहासात एकाच सामन्यात तीन निर्धाव षटकं टाकल्याची ही पहिलीच घटना आहे. युजवेंद्र चहलनंही त्याच्या पहिल्याच षटकात KKRच्या दिनेश कार्तिकला पायचीत केलं. कोलकाताचा निम्मा संघ 35 धावांत माघारी परतला होता. पॅट कमिन्सही ( 4) चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार इयॉन मॉर्गन KKRला समाधानकारक पल्ला गाठून देईल असे वाटत होते. पण, वॉशिंग्टन सुंदरनं 16व्या षटकात मॉर्गनला बाद केले. मॉर्गननं 3 चौकार व 1 षटकारासह 30 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकांत 8 बाद 84 धावांवर समाधान मानावे लागले. 

कोलकाताची ही दुसरी सर्वात निचांक खेळी आहे 67 वि. मुंबई इंडियन्स, 20088/84 वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 202095 वि. मुंबई इंडियन्स, 2009101 वि. डेक्कन चार्जर्स, 2009105 वि. मुंबई इंडियन्स, 2013 

20 षटकं खेळून सर्वात निचांक खेळी 8/84 कोलकाता नाईट रायडर्स वि. RCB, 202092/8 किंग्स इलेव्हन पंजाब वि. CSK, 2009  

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर