RCB vs DC Latest News : मोईन अलीच्या जाळ्यात मोठा मासा; देवदत्त पडीक्कलनं टिपला अफलातून झेल, Video

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 5, 2020 08:39 PM2020-10-05T20:39:11+5:302020-10-05T20:39:42+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs DC Latest News : super catch taken by Devdutt Padikkal, his excellent fielding skill through the catch of shreyas Iyer, Video | RCB vs DC Latest News : मोईन अलीच्या जाळ्यात मोठा मासा; देवदत्त पडीक्कलनं टिपला अफलातून झेल, Video

RCB vs DC Latest News : मोईन अलीच्या जाळ्यात मोठा मासा; देवदत्त पडीक्कलनं टिपला अफलातून झेल, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) च्या गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठीच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Banglore) संघानं नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आक्रमक सुरुवातीनंतर दिल्लीला सातत्यानं धक्के बसले. RCBच्या देवदत्त पडीक्कलने अफलातून झेल घेताना DCला मोठा धक्का दिला. 

पृथ्वी शॉची फटकेबाजी अन् विराट कोहलीच्या चेहऱ्यावर वाजले बारा, पाहा Video

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पाच षटकात 50 धावा फलकावर चढवल्या. पृथ्वीची फटकेबाजी पाहून RCBचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या चेहऱ्यावरील चिडचिड स्पष्ट दिसत होती. सातव्या षटकात मोहम्मद सिराजनं RCBला यश मिळवून दिले. त्यानं चौथ्या चेंडूवर पृथ्वी शॉला ( 42 धावा) यष्टिरक्षक एबी डिव्हिलियर्सकरवी झेलबाद केले. त्यानंतर विराटनं एखाद्या मोठ्या फलंदाजाला बाद केले, असा जल्लोष केला. धवन आज पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठऱला. 10व्या षटकात इसुरू उदानानं ( Isuru Udana) त्याला 32 धावांवर माघारी पाठवले.

त्यानंतर फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) स्वस्तात बाद करण्यात RCBला यश मिळाले. IPL 2020मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या मोईन अलीनं ( Moeen Ali) पहिल्याच षटकात RCBला यश मिळवून दिले. त्याच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारणाऱ्या अय्यरचा ( 11) सीमारेषेवर पडीक्कलनं अफलातून झेल घेतला. 

Royal Challengers Bangalore XI: देवदत्त पडीक्कल, आरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इसुरू उदाना, नवदीप सैनी, मोहम्मद सीराज, युजवेंद्र चहल.

Delhi Capitals XI: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, ए नॉर्ट्जे, हर्षल पटेल. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 
IN - मोईन अली, मोहम्मद सीराज
OUT - अॅडम झम्पा, गुरकिरत मान

दिल्ली कॅपिटल्स
IN - अक्षर पटेल
OUT - अमित मिश्रा 

पाहा व्हिडीओ..

Web Title: RCB vs DC Latest News : super catch taken by Devdutt Padikkal, his excellent fielding skill through the catch of shreyas Iyer, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.