RCB vs DC Latest News : विराट कोहलीचा भीमपराक्रम, पण दिल्लीनं पराभवाचा दणका देत पटकावलं अव्वल स्थान

RCB vs DC Latest News : Indian Premier League ( IPL 2020) च्या गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठीच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals)ने बाजी मारली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 5, 2020 11:11 PM2020-10-05T23:11:28+5:302020-10-05T23:21:39+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs DC Latest News: Delhi Capitals as they win by 59 runs, go top on Point Table | RCB vs DC Latest News : विराट कोहलीचा भीमपराक्रम, पण दिल्लीनं पराभवाचा दणका देत पटकावलं अव्वल स्थान

RCB vs DC Latest News : विराट कोहलीचा भीमपराक्रम, पण दिल्लीनं पराभवाचा दणका देत पटकावलं अव्वल स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) च्या गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठीच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals)ने बाजी मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Banglore) संघाच्या वाघ कागदावरच डरकाळी फोडत राहिले. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाच्या फलंदाजांच्या कामगिरीचे सातत्या याही सामन्यात पाहायला मिळाले. दिल्लीला धक्के देत आरसीबी कमबॅक करेल असे वाटले होते, परंतु मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी RCBच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. या दोघांनी RCBच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेताना DCला मोठी धावसंख्या उभारून दिली. प्र्त्युत्तरात निराशाजनक सुरुवातीनंतर विराट कोहलीनं RCBचा डाव सारवला पण त्याला साजेशी साथ मिळाली नाही. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकून Point Tableमध्ये अव्वल स्थान पटकावले.

विराट कोहलीनं मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम; रोहित शर्मानंतर पटकावले दुसरे स्थान

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पाच षटकात 50 धावा फलकावर चढवल्या. पृथ्वी शॉला ( 42 धावा) आणि शिखर धवन ( 32) बाद झाले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) स्वस्तात बाद करण्यात RCBला यश मिळाले. मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी 89 धावांची भागीदारी करून RCBच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. स्टॉयनिसला नशीबानंही साथ दिली, युजवेंद्र चहलनं त्याचा झेल सोडला, तर विराट कोहलीनं त्याला धावबाद करण्याची संधी गमावली. रिषभ पंत 37 धावांवर ( 3 चौकार व 2 षटकार) माघारी परतला. स्टॉयनिस 53 धावांवर नाबाद राहिला ( 6 चौकार व 2 षटकार). दिल्लीनं 4 बाद 196 धावा केल्या.  

विराट कोहलीकडून मोठी चूक होणारच होती, पण तो वेळीच सावध झाला; पाहा व्हिडीओ

प्रत्युत्तरात आरोन फिंचलाही ( Aaron Finch) कागिसो रबाडानं जीवदान दिले. पण, त्याला मोठी खेळी करता आली नाही. RCBचा इनफॉर्म फलंदाज देवदत्त पडीक्कलही आज स्वस्तात माघारी परतला. RCBचे दोन्ही सलामीवीर 27 धावांवर माघारी परतले. त्यानंतर विराटनं 10वी धाव घेताच विक्रमाला गवसणी घातली. विराट आणि मोइन अली सामना DCच्या हातून काढतील असेच वाटत होते. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील अपयश अलीचा IPLमध्येही पाठलाग सोडत नसल्याचे दिसले. तो 11 धावांवर बाद झाला. विराट कोहली धावा कुटत होत्या आणि त्याला रोखण्यासाठी कागिसो रबाडाला पाचारण करण्यात आले. DCचा हा डाव यशस्वी ठरला. 43 धावांवर विराटही बाद झाला. RCBनं तिथेच सामना गमावला. 

 विराट कोहलीची 'विश्व'विक्रमी कामगिरी; ट्वेंटी-20त भीमपराक्रम करणारा पहिला भारतीय

कागिसो रबाडानं ( Kagiso Rabada) 24 धावांत 4 विकेट्स घेतल्या. नॉर्ट्जे व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 196 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या RCBला 9 बाद 137 धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सनं हा सामना 59 धावांनी जिंकला. 

Web Title: RCB vs DC Latest News: Delhi Capitals as they win by 59 runs, go top on Point Table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.