RCB vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं मैदानावर उतरण्यापूर्वी केला बदल, पाहा फोटो

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) यांच्यात Dubai International Cricket Stadiumवर सामना रंगणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 5, 2020 07:02 PM2020-10-05T19:02:47+5:302020-10-05T19:03:07+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs DC Latest News : Delhi Capitals launch new jersey for game against Royal Challengers Bangalore, See pic | RCB vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं मैदानावर उतरण्यापूर्वी केला बदल, पाहा फोटो

RCB vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं मैदानावर उतरण्यापूर्वी केला बदल, पाहा फोटो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) आज अव्वल स्थानासाठीची लढाई रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) यांच्यात Dubai International Cricket Stadiumवर रंगणाऱ्या सामन्यात दोन्ही कर्णधारांचे लक्ष अव्वल स्थानाकडे असणार आहे. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) रविवारी सनरायझर्स हैदराबादवर ( Sunrisers Hyderabad) 34 धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. प्रत्येकी चार सामने खेळलेले RCB आणि DC 6 गुणांसह मागोमाग आहेत. त्यामुळे आजचा सामना जो जिंकेल तो 8 गुणांसह अव्वल स्थानावर सरकेल. 

या सामन्यापूर्वी दिल्लीला मोठा धक्का बसला. त्यांचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राने दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतूनच माघार घेतली.  ''अमित मिश्राच्या दुखापतीचा रिपोर्ट आला आणि त्याचबरोबर वाईट बातमीही येऊन धडकली. तो संपूर्ण पर्वात आता खेळणार नाही आणि त्याच्य रिप्लेसमेंटचा आम्ही विचार करत आहोत. तो चांगल्या फॉर्मात होता आणि अशात त्याला झालेली दुखापत निराशाजनक आहे. त्याचा अनुभव येथील खेळपट्टीवर चांगली कामगिरी करण्यासाठी संघाच्या कामी येत होता,''असे दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्यानं ANIला सांगितले. मिश्रानं तीन सामन्यांत 0/23, 2/35 आणि 1/14 अशी कामगिरी केली आहे. त्यानं IPLमध्ये 150 सामन्यांत 160 विकेट्स घेतल्या आहेत. लसिथ मलिंगा 170 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे.  

आजच्या सामन्यात दिल्लीचे खेळाडू नव्या जर्सीत दिसणार आहेत.
 

    

वेदर रिपोर्ट-
दिवसाचे तापमान ३७ डिग्री राहण्याची शक्यता. ह्युमिडिटी ५१ टक्के व वाऱ्याचा वेग २३ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता.

पीच रिपोर्ट-
प्रथम फलंदाजी करणाºया संघाला लाभ मिळेल, कारण त्यानंतर खेळपट्टी संथ होत जाते. त्यामुळे फलंदाजी करणे कठीण होते.

मजबूत बाजू
दिल्ली। श्रेयस अय्यरचे कुशल नेतृत्व. पृथ्वी शॉ शानदार फॉर्मात आहे. मार्कस स्टोइनिस व शिमरोन हेटमायर यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांची उपस्थिती. वेगवान गोलंदाज नॉर्जे सुरुवातीला व डेथ ओव्हर्समध्ये यशस्वी.
आरसीबी। कोहलीला गवसलेला सूर. देवदत्त पडीक्कलची शानदार कामगिरी. इसुरू उदाना व नवदीप सैनीची प्रभावी कामगिरी.

कमजोर बाजू
दिल्ली। सलामीवीर शिखर धवनचा हरवलेला फॉर्म. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा गेल्या लढतीत अपयशी.
आरसीबी। फिरकीपटू झम्पा फॉर्ममध्ये नाही. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी कमकुवत.

Web Title: RCB vs DC Latest News : Delhi Capitals launch new jersey for game against Royal Challengers Bangalore, See pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.