Join us  

RCB vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्ले ऑफसाठी पात्र; दिल्ली दुसऱ्या स्थानी

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)नंतर दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांनी प्ले ऑफचं तिकिट पक्कं केलं.

By स्वदेश घाणेकर | Published: November 02, 2020 10:53 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)नंतर दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांनी प्ले ऑफचं तिकिट पक्कं केलं. MI vs DC असा क्वालिफायर १ चा सामना ५ नोव्हेंबरला होईल. DCनं सोमवारी अखेरच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघावर सहज विजय मिळवून १६ गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान पक्के केले. या पराभवानंतरही RCBनं प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला. आता कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) सनरायझर्स हैदराबादच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.   

जोश फिलिफ आणि देवदत्त पडीक्कल यांनी RCBच्या डावाची सुरुवात केली. कागिसो रबाडानं पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फिलिफ ( १२) माघारी पाठवले. त्यानंतर विराट कोहली व पडीक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. आर अश्विननं ही भागीदारी संपुष्टात आणताना कोहलीला ( २९) माघारी पाठवले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०व्या डावात आर अश्विननं प्रथमच विराटला बाद केलं. RCBच्या कर्णधाराला बाद करण्यासाठी अश्विनला १२५व्या चेंडूची वाट पाहावी लागली. पडीक्कलनं ४० षटकांत अर्धशतक पूर्ण केलं. IPL 2020मधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. यासह त्यानं लोकेश राहुलच्या पाच अर्धशतकांशी बरोबरी केली. 

पदार्पणात अनकॅप भारतीय खेळाडूनं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. शिखऱ धवननं २००८मध्ये दिल्ली डेअरडेव्हिलसाठी ४ अर्धशतकं झळकावली होती. श्रेयस अय्यरनं २०१५ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी ४ अर्धशतकं केली होती. पण, नॉर्ट्झेच्या एका षटकानं RCBला दणका दिला. अर्धशतकवीर पडीक्कल ( ५०) याचा त्रिफळा उडवल्यानंतर ख्रिस मॉरिसलाही ( ०) त्यानं झेलबाद केले. एबी डिव्हिलियर्स आणि शिवम दुबे यांनी फटकेबाजी केली. २१ चेंडूंत ३५ धावा करणारा एबी अखेरच्या षटकात धावबाद झाला. RCBला ७ बाद १५२ धावाच करता आल्या. कागिसो रबाडानं ३० धावांत २ विकेट्स घेतल्या. नॉर्ट्झेनं ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

प्रत्युत्तरात पृथ्वी शॉ ( ९) याला आजही अपयश आले असले तरी शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे दमदार खेळ करताना RCBच्या गोलंदाजांना हतबल केलं. समोर पराभव दिसत असल्यामुळे विराट कोहलीही निराश दिसत होता. मागील दोन सामन्यांत भोपळ्यावर माघारी परतलेल्या धवननं ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. धवन ४१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रहाणेनं ३७ चेंडूंत अर्धशतक झळकावलं. IPL 2020मधील हे त्याचे पहिलेच अर्धशतक ठऱलं. शाहबाज अहमदनं DCचा कर्णधार श्रेयस अय्यरला ( ७) बाद करून विराटच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. त्यानंतर रहाणेही बाद झाला. त्यानं ४६ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ६० धावा केल्या. दिल्लीनं १९ षटकांत ४ बाद १५४ धावा करून विजय पक्का केला. 

कसं होतं पात्रता फेरीचं गणित?दिल्ली कॅपिटल्सला किमान १३४ धावा तरी कराव्या लागतील, मग ते पराभूत होऊनही नेट रन रेटच्या जोरावर KKRपेक्षा सरस ठरतील.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला DC ला किमान १७.३ षटकं खेळवण्यास भाग पाडावं लागेल, त्यानंतर RCB पराभूत होऊनही नेट रन रेटच्या जोरावर KKRच्या पुढे राहतील.

 

टॅग्स :IPL 2020दिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर